Saturday, October 10, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

सरकार एमपीएससी विद्यार्थ्यांच्या हिताचाच विचार करत आहे – आमदार शंकर जगताप

 

पुणे : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या पुण्यामध्ये सुरू असलेल्या आंदोलनाचा राज्य सरकार संवेदनशीलपणे विचार करत आहे. त्यांच्या 13 पैकी 12 मागण्या यापूर्वीच सरकारने मान्य केले आहेत . केवळ ऑब्जेक्टिव्ह च्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. त्या संदर्भातही लवकरच तोडगा निघेल. राज्य सरकार एमपीएससी विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करत आहे , परंतु विरोधकांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे भांडवल करून राजकारण करू नये असे आवाहन आमदार शंकर जगताप यांनी केले.
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या नवी पेठेतील अहिल्यादेवी शिक्षण संस्थे समोर सुरू असलेल्या आंदोलनाला आमदार शंकर जगताप यांनी भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा केली त्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींची बोलत होते.

शंकर जगताप म्हणाले, अहिल्यादेवी शिक्षण संस्थेसमोर सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन हे कोणत्याही राजकीय स्वरूपाचे आंदोलन नाही, येथील विद्यार्थी हे महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून, शेताच्या बांधावरून पुण्यामध्ये शिकण्यासाठी आले आहेत. या विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा संवेदनशील पणे विचार करून सरकारने त्यांच्या 13 पैकी 12 मागण्या यापूर्वीच मान्य केले आहेत. केवळ एका मागणीसाठी या विद्यार्थ्यांचे आंदोलन सध्या सुरू आहेत त्या संदर्भातही सरकार विचार करत आहे.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगात मध्ये काही अनुचित प्रकार घडला, त्या संदर्भात सरकारने विशेष चौकशी समिती नेमली आहे . सरकार या संदर्भात तत्परतेने पावले उचलत आहे. परंतु विरोधक मात्र विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे भांडवल करून आपले राजकीय हित जपण्याचा प्रयत्न करत आहेत. मी स्वतः 1997 ते 2000 सालापर्यंत एमपीएससी चा विद्यार्थी होतो. त्यामुळे सरकारचा प्रतिनिधी आणि विद्यार्थी या दोन्ही नात्याने मला एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या अडचणी माहिती आहेत. या संदर्भात मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात या संदर्भात चर्चा करणार आहे असेही आमदार शंकर जगताप यांनी यावेळी सांगितले.

एस एम जोशी पुलावर सुरू असलेले एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची मुख्य मागणी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामासाठी आहे. परंतु कायद्यानुसार ही मागणी शक्य होणार नाही. या संदर्भात विद्यार्थ्यांना आणि त्यांना पाठिंबा असणाऱ्या राजकीय व्यक्तींनाही माहिती आहे, परंतु केवळ राजकीय भांडवल करण्यासाठी हे आंदोलन केले जात आहे असेही शंकर जगताप यांनी यावेळी टीका केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading