Friday, July 3, 2026
Latest NewsPUNE

दमांच्या आठ कथा ऑडिओ बुक स्वरूपात

रविवारी प्रकाशन : यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रम

पुणे : मराठी साहित्यातील चतुरस्र व्यक्तिमत्व असलेले द. मा. मिरासदार यांनी लिहिलेल्या आठ कथांचा दुर्मिळ ठेवा देश-विदेशातील रसिकांच्या भेटीला प्रथमच येत आहेत. या कथांचे स्वत: दमांनी केलेले अभिवाचन पहिल्यांदाच ऑडियो बुक स्वरुपात स्टोरीटेल ॲपवर प्रकाशित करण्यात येणार आहेत.

या ऑडिओ बुकचा प्रकाशन सोहळा रविवार, दि. ५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. ‘धडपडणारी मुले’, ‘नदीकाठचा प्रकार’, ‘९९ बादची एक सफर’, ‘फुकट, ‘भुताचा जन्म’, ‘व्यंकूची शिकवणी’, ‘शिवाजीचे हस्ताक्षर’ आणि ‘साक्षीदार’ या आठ कथा ऑडिओ बुक्स स्वरूपात स्टोरीटेलवर प्रकाशित करण्यात येणार आहेत, अशी माहिती संयोजक सुनेत्रा मंकणी, प्रसाद मिरासदार यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.

द. मा. मिरासदार यांचे बंधू, विनोदी लेखक वसंत मिरासदार यांच्या हस्ते ऑडिओ बुक्सचे प्रकाशन होणार असून अभिनेते, नाटककार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण कार्यक्रमाच्या

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading