शेताच्या सीमेपलीकडे मूल्यनिर्मिती: गोदरेज ॲग्रोवेटच्या विकासाचा पुढील टप्पा
- सुनील कटारिया, गोदरेज ॲग्रोव्हेट लिमिटेडचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक
भारतीय कृषी क्षेत्र जसजसे विकसित होत आहे, तसतसे कृषी-उद्योगांनी देखील काळानुसार बदलले पाहिजे. यात प्रामुख्याने ग्राहकांची बदलती पसंती, हवामानातील बदल आणि बाजारपेठेची बदलती गतिशीलता याचा समावेश आहे. गोदरेज ॲग्रोव्हेटसाठी याचा अर्थ कोणत्याही एका पिकावरील, भौगोलिक क्षेत्रावरील किंवा उत्पादन श्रेणीवरील अवलंबित्व सोडून शाश्वत विकासासाठी अनेक पर्याय तयार करणे होय.
याच तत्त्वज्ञानाने कंपनीच्या प्रवासाला आधार दिला आहे, ज्याअंतर्गत गोदरेज ॲग्रोव्हेटने प्रथमच ₹10,000 कोटींचा महसूल ओलांडला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, आम्ही पीक निगा, पशू पोषण, दुग्धव्यवसाय, खाद्यपदार्थ आणि पाम तेल या क्षेत्रांचा समावेश असलेला एक वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ तयार केला आहे. कृषी परिसंस्थेमध्ये अधिक मूल्य निर्माण करत असताना, अधिक ग्राहक-केंद्रित बनण्यावर विकासाचा पुढील टप्पा केंद्रित आहे.
प्रत्येक व्यावसायिक निर्णयाची सुरुवात ग्राहकापासून व्हायला हवी…हे साधे तत्त्वज्ञान या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी आहे. मग तो अधिक उत्पादनाच्या शोधात असलेला शेतकरी असो, दर्जेदार घटक शोधणारा अन्न उत्पादक असो किंवा आरोग्यदायी उत्पादनांची मागणी करणारा ग्राहक असो, काळानुसार बदलणाऱ्या गरजा समजून घेणे हेच कंपनीच्या गुंतवणुकीला, नवनवीन कल्पनांच्या प्रवाहाला आणि बाजारपेठेतील धोरणाला आकार देत आहे.
व्यवसायात लवचिक असणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. कृषी क्षेत्रापुरता विचार करायचा तर, एकाच पिकावर किंवा भौगोलिक क्षेत्रावर अवलंबून राहिल्याने हवामानातील बदल, बाजारपेठेतील बदलती परिस्थिती आणि मागणीतील बदलांना सामोरे जावे लागू शकते. हे लक्षात घेऊनच अधिक संतुलित विकास पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी गोदरेज ॲग्रोव्हेट विविध पीक विभागांमध्ये आपली उपस्थिती मजबूत करतानाच नवीन भौगोलिक क्षेत्रांमध्ये विस्तार करत आहे.
उदाहरणार्थ, आमचा पीक संरक्षण व्यवसाय आता कापसाच्या पलीकडे आपले लक्ष विस्तारत आहे. पूर्वी, या व्यवसायाचा जवळपास ४५% भाग कापसाच्या तणनाशकांवर अवलंबून होता. आज, आम्ही मका आणि भात यांसारख्या अनेक विभागांमध्ये आमचा पोर्टफोलिओ विस्तारत आहोत, तसेच यातील केंद्रीकरणाचा धोका कमी करण्यासाठी तणनाशके, बुरशीनाशके आणि कीटकनाशकांमधील आमचे अस्तित्व अधिक मजबूत करत आहोत.
वाढीचे आणखी एक महत्त्वाचे क्षेत्र मूल्यवर्धित खाद्यपदार्थांमध्ये आहे. भारतातील प्रथिनांचा वापर सातत्याने वाढत असल्यामुळे, ग्राहक अधिकाधिक सोयीस्कर, उच्च-गुणवत्तेच्या दुग्धजन्य आणि कुक्कुट उत्पादनांच्या शोधात आहेत. ग्राहकांसाठी अधिक मजबूत ब्रँड तयार करणे आणि दुग्धजन्य तसेच प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये मूल्यवर्धित उत्पादनांचा विस्तार करणे हे कंपनीसाठी एक प्रमुख धोरणात्मक प्राधान्य असेल.
मूल्य निर्मितीचे तेच तत्त्वज्ञान आमच्या पाम तेल व्यवसायाला मार्गदर्शक ठरले आहे. मोठ्या प्रमाणातील लागवड उत्पादनक्षम वर्षांमध्ये प्रवेश करत असल्याने, कंपनी आता विशेष फॅट्सच्या निर्मितीद्वारे डाउनस्ट्रीम क्षमता मजबूत करत आहे, ज्यामुळे लागवडीपासून ते प्रक्रियेपर्यंतच्या संपूर्ण पुरवठा साखळीत अधिक मूल्य निर्मिती होते आहे.
कंपनीच्या विकासाच्या प्रवासात तंत्रज्ञान आणि सल्लागार सेवा यांची देखील महत्त्वाची भूमिका असते. आजच्या आधुनिक शेतीचा विचार करायचा तर केवळ दर्जेदार उत्पादनांपेक्षा आणखी काही त्यासाठी गरजेचे आहे. त्यासाठी ज्ञान, वैज्ञानिक पद्धती आणि शेतकऱ्यांचा अधिक मजबूत सहभाग आवश्यक आहे. नवोन्मेष आणि प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती यांचा मेळ घालून, शेतकऱ्यांना उत्पादकता सुधारण्यास मदत करणे आणि त्याच वेळी शेती अधिक सर्वसमावेशक करणे, हे आमचे ध्येय आहे.
भारतात कृषी क्षेत्रात प्रचंड संधी आहे, परंतु शाश्वत वाढीसाठी व्यवसायांना वेगवान आणि भविष्यासाठी सज्ज राहणे आवश्यक आहे. गोदरेज ॲग्रोव्हेटसाठी याचा अर्थ आहे…सातत्यपूर्ण वैविध्य, ग्राहकांशी असलेले संबंध दृढ करणे, संपूर्ण मूल्य साखळीत गुंतवणूक करणे आणि शेतकरी, ग्राहक तसेच व्यापक कृषी अर्थव्यवस्थेसाठी शाश्वत मूल्य निर्माण करणारी अनेक विकास इंजिने तयार करणे.
