डाबर रुमाटिलतर्फे पंढरपूर वारीतील वारकऱ्यांसाठी आरोग्यसेवेचा उपक्रम
पुणे : जगातील आघाडीची आयुर्वेदिक उत्पादने उत्पादक कंपनी डाबर इंडिया लिमिटेड यांनी पंढरपूरच्या पवित्र वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मार्गातील विविध ठिकाणी विशेष आयुर्वेदिक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिरांमध्ये आरोग्य तपासणी तसेच डाबर रुमाटिल तेलाद्वारे आयुर्वेदिक पाय व पाठीचा मसाज अशा सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत तज्ज्ञ आरोग्यसेवक या शिबिरांमध्ये कार्यरत असून, लाखो वारकऱ्यांना उपचारात्मक, प्रतिबंधात्मक आणि आरोग्यवर्धक सेवा पुरविण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धार्मिक परंपरांपैकी एक असलेली आषाढी एकादशी वारी सोलापूर जिल्ह्यातील चंद्रभागा नदीच्या तीरावर वसलेल्या पंढरपूर येथे येऊन समाप्त होते. भगवान विठोबाचे प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूरमध्ये दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. डाबर इंडिया लिमिटेडचे एथिकल मार्केटिंग प्रमुख डॉ. दुर्गा प्रसाद म्हणाले, “१४५ वर्षांहून अधिक समृद्ध परंपरा लाभलेल्या डाबरसाठी देशभरातून येणाऱ्या ५० लाखांहून अधिक वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि त्यांच्या वारीला हातभार लावणे ही अभिमानाची बाब आहे. प्रत्येक कुटुंबाच्या आरोग्य आणि कल्याणासाठी समर्पित राहण्याच्या आमच्या ध्येयाशी हा उपक्रम सुसंगत आहे. या सामाजिक कार्याचा भाग होताना आम्हाला आनंद होत असून, या उपक्रमाद्वारे वारकऱ्यांना सुरक्षित प्रवास आणि प्रभावी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.” ते पुढे म्हणाले, “आयुर्वेदात दीर्घ पायी प्रवास आणि यात्रेदरम्यान शरीराचा समतोल व स्फूर्ती टिकवून ठेवण्यावर विशेष भर दिला जातो. वारीदरम्यान सतत चालण्यामुळे वारकऱ्यांना स्नायूंचा थकवा, सांध्यांमध्ये कडकपणा, पाठदुखी आणि सर्वसाधारण अशक्तपणाचा त्रास जाणवू शकतो. पारंपरिक आयुर्वेदिक ज्ञानावर आधारित डाबर रुमाटिल तेलामध्ये कालपरिक्षित औषधी वनस्पतींचा समावेश असून, ते स्नायू आणि सांध्यांतील दैनंदिन वेदना व अस्वस्थतेपासून आराम देण्यास मदत करते. या आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून दाबर आयुर्वेदाचे फायदे जनतेपर्यंत पोहोचवत असून, वारकऱ्यांना सर्वांगीण आरोग्य सहाय्य उपलब्ध करून त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाला अधिक सुखकर आणि आरोग्यदायी बनविण्याचा प्रयत्न करत आहे.”
Read More