Sunday, October 11, 2026
BusinessLatest News

बॉलीवूड अभिनेत्री तबू यांच्या हस्ते कल्याण ज्वेलर्सच्या बारामतीतील पहिल्या शोरूमचे उदघाटन 

बारामती:  भारतातील एक सर्वात विश्वसनीय ज्वेलरी ब्रँड, कल्याण ज्वेलर्सने बारामतीमध्ये आपले पहिले शोरूम सुरु करून, महाराष्ट्रातील रिटेल विस्ताराच्या घोडदौडीत एक लक्षणीय टप्पा गाठला आहे. लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री श्रीमती तबू यांच्या शुभहस्ते बारामतीतील नवीन कल्याण ज्वेलर्स शोरुमचा शानदार उदघाटन सोहळा पार पडला.

यासोबतच, कल्याण ज्वेलर्सचा लाईफस्टाईल ज्वेलरी ब्रँड, केनडियरच्या शोरूमचे देखील उदघाटन करण्यात आल्यामुळे शुभारंभाचा आनंद वृद्धिंगत झाला. केनडियर हा ब्रँड ट्रेंडी दागिने व आधुनिक डिझाईन्ससाठी नावाजला जातो. केनडियरचे दागिने कमी वजनाचे असतात, त्यामुळे आजची जेन झी पिढी, नोकरी व्यवसाय करणाऱ्या महिला, इतकेच नव्हे तर स्टाईल-सॅव्ही पुरुषांना देखील ते खूप आपलेसे वाटतात. यांच्या किमती फक्त १०,००० रुपयांपासून सुरु होत असल्याने, कायम आठवणीत राहील अशी शानदार भेट म्हणून देण्यासाठी अगदी योग्य आहेत. ऑनलाईन खरेदी करता येईल असा ब्रँड म्हणून सुरुवात करून ते आता ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमांतून उपलब्ध असणारा ब्रँड बनण्यापर्यंतचा प्रवास करताना, केनडियरने ऑनलाईन खरेदीतील सहजता आणि प्रत्यक्ष दुकानात जाऊन दागिने हाताळून पाहण्याचा अनुभव यांचा सुरेख संगम घडवून आणण्याला नेहमीच प्राधान्य दिले आहे.

कल्याण ज्वेलर्सचे ग्राहक आणि चाहते यावेळी प्रचंड संख्येने उपस्थित होते, त्यांना उद्देशून अभिनेत्री श्रीमती तबू म्हणाल्या, “बारामतीमध्ये कल्याण ज्वेलर्सच्या पहिल्या शोरुमचे उदघाटन करताना मला खूप आनंद झाला. कल्याण ज्वेलर्स हा ब्रँड विश्वास, पारदर्शकता आणि भारतीय वारशाविषयी सखोल आदरावर उभा आहे. हे नवीन शोरूम खरोखरच अप्रतिम आहे. कल्याण ज्वेलर्सचे सोने, हिऱ्यांचे दागिने आणि वधूवधूंसाठीच्या खास कलेक्शन्सचे वैभव येथील स्थानिक ग्राहकांसाठी उपलब्ध झाले आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, बारामतीकर या दागिने खरेदीच्या परिपूर्ण अनुभवाचे जंगी उत्साहाने स्वागत करतील.”

नवीन शोरूमच्या उदघाटन प्रसंगी कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक श्री रमेश कल्याणरमण यांनी सांगितले, “बारामतीमध्ये आमचे पहिले शोरूम सुरु करून महाराष्ट्रामध्ये आमचे स्थान अधिक मजबूत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. कल्याण ज्वेलर्स आणि केनडियर शोरूम्स ग्राहकांसाठी दागिन्यांच्या सर्वसमावेशक खरेदीचे ठिकाण ठरेल. सदाबहार कलाकुसर, आधुनिक डिझाईन्स आणि दागिने खरेदीचा अतुलनीय अनुभव हे सर्वकाही एकाच ठिकाणी उपलब्ध होत आहे. विश्वास, पारदर्शकता आणि गुणवत्ता या आमच्या मूलभूत मूल्यांचे पालन करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला सर्वोत्तम दागिने, प्रमाणित कारीगरी आणि अतुलनीय सेवा मिळाव्यात यासाठी आम्ही सज्ज आहोत.”

नवीन स्टोर सुरु होत झाल्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी, कल्याण ज्वेलर्स ब्रँड ग्राहकांसाठी घेऊन येत आहे एक विशेष शुभारंभ ऑफर! १ लाख रुपये आणि त्यापेक्षा जास्त किमतीच्या प्रत्येक खरेदीसोबत, खरेदी किमतीच्या ५०% पर्यंतच्या दागिन्यांवर ०% घडणावळ शुल्काचा लाभ घेता येईल. तसेच, ग्राहक जुने सोने बदलून घेताना ०% कपातीचा (डिडक्शन) लाभ घेऊ शकतात, सोबतच जुन्या सोन्याच्या बदल्यात त्वरित रोख रक्कमही मिळवू शकतात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading