Thursday, July 23, 2026
Latest NewsPUNE

टाकेडाची क्यूडेंगा (टाक-००३) ही भारतात मंजुरी मिळालेली पहिली डेंग्यू लस, डेंग्यू प्रतिबंध क्षेत्रात एक नवे पर्व

 

पुणे: टाकेडा बायोफार्मास्युटिकल्स इंडिया प्रा. लि. ने आज ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) वय वर्षे ४ ते ६० वयोगटातील व्यक्तींमध्ये डेंग्यू रोगाच्या प्रतिबंधासाठी टाकेडाच्या ‘क्यूडेंगा’ या डेंग्यू लसीला बाजार परवाना (सीटी-२०, नवीन औषधे आणि चिकित्सकीय चाचण्या (एनडीसीटी) नियम, २०१९) दिला आहे. क्यूडेंगा ही भारतात मंजूर झालेली पहिली डेंग्यू लस असून लसीकरणापूर्वीच्या चाचणीची आवश्यकता भासत नाही. तसेच, पूर्वी डेंग्यूचा संसर्ग झाला असो वा नसो, ती लोकांवर वापरली जाऊ शकते. ही मंजुरी भारतातील डेंग्यू प्रतिबंधाचे प्रयत्न अधिक बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असून इथे हा रोग एक मोठे सार्वजनिक आरोग्य आव्हान ठरला आहे.

डेंग्यू हा डासांमुळे पसरणारा एक विषाणूजन्य आजार आहे. तो जागतिक सार्वजनिक आरोग्यासाठी एक मोठा धोका असून १२५ हून अधिक देशांमध्ये त्याचा प्रादुर्भाव आहे. जागतिक स्तरावर डेंग्यूच्या एकूण रुग्णांपैकी जवळपास एक तृतीयांश रुग्ण भारतात आहेत. नोंदवलेल्या रुग्णांची संख्या २०२५ मध्ये १,१३,००० पेक्षा जास्त होती, परंतु मॉडेलिंग विश्लेषणानुसार भारतातील डेंग्यूचा भार नोंदवलेल्या संख्येपेक्षा जास्त असल्याचे दिसते. हे दरवर्षी लाखो संसर्गांचे प्रतिनिधित्व करते.

आंतरखंडीय बाजारपेठेचे प्रमुख डॉ. महेंद्र नायक म्हणाले, “डेंग्यू हे एक वाढते सार्वजनिक आरोग्य आव्हान आहे आणि भारताला शाश्वत, पुराव्यावर आधारित प्रतिबंधाची गरज आहे. क्यूडेंगा लसीची अद्ययावत सात वर्षांची आकडेवारी चारही सेरोटाइप्समध्ये डेंग्यू संसर्ग आणि रुग्णालयात दाखल होण्यापासून सतत संरक्षण दर्शवते. हा समुदाय आणि आरोग्य प्रणालींसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. क्यूडेंगा २०२२ मध्ये बाजारात आल्यापासून या लसीला ४३ देशांमध्ये मान्यता मिळाली आहे आणि जगभरात ३२ दशलक्षाहून अधिक डोस वितरित केले गेले आहेत. ही मान्यता भारतातील डेंग्यू प्रतिबंध मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. टाकेडाच्या २४५ वर्षांच्या वारशावर आणि ७० वर्षांहून अधिक लसीच्या कौशल्यावर आधारित राहून आम्ही सार्वजनिक आरोग्य अधिकारी, आरोग्यसेवा व्यावसायिक आणि भागीदारांसोबत समान आणि शाश्वत उपलब्धतेसाठी काम करण्यास वचनबद्ध आहोत.”

वाढते आजार, वेगाने होणारे शहरीकरण आणि डासांच्या वाढीस चालना देणाऱ्या हवामानाशी संबंधित घटकांमुळे दरवर्षी लाखो भारतीयांच्या जिवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे डेंग्यू हा संपूर्ण वर्षभर सार्वजनिक आरोग्यासाठी धोका बनला आहे आणि हंगामी लाटांमुळे आरोग्यसेवा प्रणालींवर सतत ताण येत आहे. डेंग्यूचे व्यवस्थापन करणेदेखील गुंतागुंतीचे असून त्यावर कोणताही विशिष्ट उपचार नाही. त्याची झपाट्याने गंभीर, जीवघेण्या गुंतागुंतीत वाढ होऊ शकते आणि त्यासाठी रुग्णालयात दाखल करणे आणि अतिदक्षता विभागाची गरज भासते.

दक्षिण-पूर्व आशिया आणि भारतीय उपखंडाचे महाव्यवस्थापक पीटर स्ट्रेबलम्हणाले, “डेंग्यू हे एक सामायिक प्रादेशिक आव्हान असून त्यासाठी सीमा आणि क्षेत्रांच्या पलीकडे जाऊन सहकार्याची आवश्यकता आहे. टाकेडा दक्षिण आणि दक्षिण-पूर्व आशियातील सरकारे, सार्वजनिक आरोग्य अधिकारी, आरोग्यसेवा व्यावसायिक आणि भागीदारांसोबत काम करण्यास वचनबद्ध आहे. केवळ मंजूर आणि शिफारस केलेल्या ठिकाणी क्यूडेंगाच्या उपलब्धतेला पाठिंबा देण्यासाठीच नव्हे तर निगराणी, जागरूकता, कीटक नियंत्रण आणि सामुदायिक सहभागासह व्यापक डेंग्यू प्रतिबंध प्रयत्नांना बळकट करण्यासाठीही आम्ही कटिबद्ध आहोत. प्रत्येक देशाच्या गरजा प्रतिबिंबित करणाऱ्या शाश्वत, पुराव्यावर आधारित उपायांमध्ये योगदान देणे हे आमचे ध्येय आहे.”

दक्षिण-पूर्व आशिया आणि भारतीय उपखंड विभागाचे वैद्यकीय कामकाज प्रमुख डॉ. गोह चू बेंग म्हणाले, “भारतावर डेंग्यूचा मोठा भार आहे आणि अनेक प्रदेशांमध्ये डेंग्यू विषाणूचे चारही सेरोटाइप एकत्र पसरत असल्याचे नोंदवले गेले आहे. क्यूडेंगा हे पूर्वी संसर्ग झाला असो वा नसो तरीही चारही सेरोटाइपपासून संरक्षण देण्यासाठी तयार केले आहे. कीटक नियंत्रण, निगराणी, सामाजिक जागरूकता आणि इतर सार्वजनिक आरोग्य उपायांसोबतच डेंग्यू प्रतिबंधासाठी भारताचा सर्वसमावेशक दृष्टिकोन मजबूत करण्याच्या दिशेने याला मिळालेली मंजुरी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading