राहुल गांधी ‘अनुत्पादक व अपयशी’ असतील, तर पंतप्रधान मोदी, त्यांचे वर टिका करण्यात वेळ का घालवतात..? कॉँग्रेसचा थेट सवाल
पुणे : भाजप’चे शीर्ष नेतृत्व, भाषणजीवी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘NDTV World Summit) या आंतरराष्ट्रीय स्तरावरील जागतिक परिषद समीट’ मध्ये, देशाची विविध क्षेत्रातील प्रगती, उपलब्धी (achievements) देशांतर्गत होणारे आरोप इ वर बोलणे देशाचे पंतप्रधान म्हणून अपेक्षित होते. मात्र त्या मुद्यांवर बोलण्या ऐवजी, त्यांनी आपल्या भाषणाचा सर्वाधिक रोख हा केवळ आणि केवळ
विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांचेवरच् टिका करण्यात, स्वतःला धन्य मानत व राहूल गांधी हे अतिशय ‘अपयशी व अनुत्पादक’ (?) असल्याचे सांगितले.
त्यातुन देशाच्या पंतप्रधान पदाच्या गरीमेस बाधा पेहोचत आहे. तसेच त्यातुन (कॉमन सेन्स) सर्वसाधारण प्रश्न ही असा समोर येतो की, जर (विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी) खरोखरच एवढे अपयशी व अनुत्पादक (?) असतील तर देशाचे पंतप्रधान, जागतीक व्यासपीठावर केवळ ‘विरोधी पक्ष नेत्यावर’ टिका टिप्पण्णीत व गरळ ओकण्यात अशा व्यासपीठावर “भारतासाठी मिळालेला मोलीक – वेळ” वाया का घालवत होते..(?)
ऐवजी त्यांनी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय समस्या, सत्ता-पक्षावर विविध घटकांकडून होणारे आरोप, महागाई, बेरोजगारी, अमेरीकेची दादागिरी इ वर बोलले असते तर ते अधिक राजधर्माचे व पुरषार्थाचे लक्षण ठरले असते.. अशी उपहासात्मक टिका मोदींच्या विरोधी पक्षा प्रती असलेल्या द्वेष कारक टिकेस प्रत्युत्तरदाखल महाराष्ठ्र प्रदेश काँग्रेस चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी निवेदना द्वारे केली.
ते पुढे म्हणाले की,
देशातील जनतेने २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये राहुल जी गांधी यांचे नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाच्या १००% जागा वाढवून १०२ केल्या व भाजप’च्या ३३% जागा कमी करून २४० केल्या जरी २०१४, २०१९ ते २०२४ पर्यंतचा १० वर्षांचा मोदी सरकारचा हुकुमशाही कालावधीचा, ईडी – सीबीआय, निवडणूक आयोग इ वरील उपस्थित झालेले गंभीर आरोप लक्षात घेता.. २०२४ मधील वास्तवता
भाजप नेते, पंतप्रधान मोदी देशातील जनतेचा कौल सोईस्कर विसरतात व भाजप हा चंद्राबाबू नायडू व नितीशकुमार यांच्या कुबड्यांवर तरल्याकडे डोळेझाक करतात ही त्यांची सत्तालोभी अपरीहार्यता असल्याची टीका ही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली..!
