पार्क एव्हेन्यू ब्रँण्डचे महिलांसाठी फॉर हर परफ्युम बाजारात दाखल
मुंबई : भारतीय महिलांमध्ये चांगल्या दर्ज्याच्या परफ्युमची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. महिलांची ही वाढती मागणी लक्षात घेत गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्सच्या ‘पार्क एव्हेन्यू’ या प्रसिद्ध ब्रँण्डने आता महिलांसाठी परफ्युमची निर्मिती करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ‘पार्क एव्हेन्यू’ या ब्रँण्डने ‘पार्क एव्हेन्यू फॉर हर’ हा नव्या परफ्युमची रेंज बाजारात आणलीआहे. या रेंजअंतर्गत पोईज, ग्रेस, व्हर्व्ह, अयलुर असे चार वेगवेगळे प्रकार उपलब्ध असतील. या परफ्युममध्ये नुकताच तयार केलेल्या सुंगधीयुक्त फुलांचा, सौम्य मसाले तसेच उबदार लाकडी सुगंधांचा समतोल अनुभव घेता येतो. प्रत्येक परफ्युम विचारपूर्वक पद्धतीतून तयार करण्यात आला आहे. हा सुवास अंगावर दीर्घकाळ टिकून राहतो. महिलांना एक अनोखा व समृद्ध अनुभव मिळतो.
आयएमएआरसीच्या अहवालानुसार, २०२५ मध्ये भारतातील परफ्युम बाजारपेठेत सुमारे १ हजार २५० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स इतकी उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या बाजारपेठेत, महिलांचा सर्वाधिक वाटा असून, २०२५ मध्ये हा वाटा ५२ टक्क्यांपर्यंत उंचावल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. ही वाढती मागणी लक्षात घेत पार्क एव्हेन्यूने ‘फॉर हर’ ही नवी परफ्युम रेंज सुरु केली आहे. ही नवी रेंज ब्रँण्डच्या विस्तारातील महत्त्वाचा टप्पा माला जात आहे. आतापर्यंत हा ब्रँण्ड केवळ पुरुषांचे सुवासिक आणि ग्रुमिंग उत्पादने बनवण्यासाठी ओळखला जायचा. आता मात्र या ब्रँण्डने आपल्या पारंपरिक ओळखीच्या पलीकडे जात भारतातील परफ्युम क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. यामुळे ब्रँण्डच्या व्यवसायाला नवी वेगळी दिशा मिळाली आहे.
पार्क एव्हेन्यू ‘फॉर हर’ ही रेंज आधुनिक आणि आत्मविश्वासाने वावरणाया महिलांची जीवनशैली लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. हे परफ्युम प्रत्येक मूड आणि प्रसंगाला साजेसे ठरतात. कार्यालयीन ठिकाण, सायंकाळचे सामाजिक कार्यक्रम किंवा वैयक्तित कौटुंबिक सोहळे या प्रत्येक प्रसंगात ‘पार्क एव्हेन्यू फॉर हर’ परफ्युमचा सुवास खास ठरतो. हे परफ्युम दैनंदिन आयुष्यातील वापराकरिताही साजेसे आहेत. सणोत्सवात किंवा इतर प्रसंगात महिलांना भेटवस्तू स्वरुपात देण्यासाठीही या परफ्युमची निवड करता येईल.
या परफ्युमच्या अनावरणाप्रसंगी गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे पर्सनल केअरचे मार्केटिंग हेड समीर सूर्यवंशी म्हणाले, “भारतातील सुगंधित उत्पादनांची बाजारपेठ वेगाने विकसित होत आहे. या बाजारपेठेत दर्जेदार उत्पादनांना पसंती दिली जात आहे. हा बदल महिलांच्या परफ्युम बाजारपेठेत प्रामुख्याने दिसून येत आहे. महिला आकर्षक, दर्जदार आणि दीर्घकाळ टिकणा-या सुगंधाला प्राधान्य देतात. पार्क एव्हेन्यूने पुरुषांच्या परफ्युममध्ये आपले मजबूत स्थान निर्माण केले आहे. आता महिलांच्या गरजा लक्षात घेत सर्वसमावेशक परफ्युम रेंज तयार करण्याची ही योग्य वेळ असल्याचे आम्हांला वाटते. ही उत्पादने मॉडर्न स्टोअर आणि ई कॉमर्स प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध करण्यात आली आहेत. शहरी बाजारपेठेंत या उत्पादनांचा विस्तार करण्यावर आमचा भर राहील.”
‘पार्क एव्हेन्यू फॉर हर’ परफ्युम १०० मिलीच्या आकर्षक बाटल्यांमध्ये उपलब्ध असून, या एका बाटलीची किंमत ७९९ रुपये आहे. याचसोबत कंपनीने खास ‘४इन१’ डिस्कव्हरी गिफ्ट सेटही सादर केला आहे. या गिफ्टसेटची किंमत ८४९ रुपये असून, यामध्ये चारही प्रकारच्या सुगंधाच्या २० मिलीच्या छोट्या बाटल्या मिळतात. ही नवीन श्रेणी ग्राहकांसाठी सर्व मोठ्या मॉडर्न ट्रेड रिटेल दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. अमेझॉन, फ्लिपकार्ट, नायका, झेप्टो या ई-कॉमर्सवरही हे परफ्युम खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
भारतातील सुगंधित उत्पादनांच्या वाढत्या बाजारपेठेत पार्क एव्हेन्यूने आपले भक्कम स्थान निर्माण केले आहे. दर्जेदार उत्पादने आणि सततच्या नवनवीन प्रयोगांमुळे या ब्रँण्डने ग्राहकांचा विश्वास संपादित केला आहे. सध्या ग्राहक निवडक परफ्युमला प्राधान्य देतात. आवड आणि अनुभवाच्या जोरावर परफ्युम निवडले जातात. ग्राहकांचा हा बदलता कल लक्षात घेत ब्रँण्डने बदलत्य काळाच्या गरजा जपल्या आहेत. हे परफ्युम उच्च दर्ज्याचे असून, दैनंदिन वापरासाठी योग्य आहेत. पार्क एव्हेन्यू फॉर हरची नवी सुरुवात म्हणजे ब्रँण्डच्या याच यशस्वी प्रवासाचा पुढचा टप्पा आहे. या उत्पादनांच्या निर्मितीमुळे ब्रँण्डची भारतातील परफ्युम बाजारपेठेतील पकड अधिक मजबूत होणार आहे.
