Sunday, October 18, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

शिक्षकांचे प्रश्न तत्परतेने सोडविणारे कार्यकर्ते : सुनील जगताप


पुणे: पुणे शिक्षक मतदार संघातून एकूण 30 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यात सुनील जगताप हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या आंदोलनात सुनील जगताप यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून पाचही जिल्ह्यांमध्ये विविध शाळा महाविद्यालयांमधील शिक्षकांच्या भेटीगाठी घेण्याचे काम सुनील जगताप करत असून त्यांना शिक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

पुणे शिक्षक मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक काळ शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्परतेने काम करणारे शिक्षकांचे कार्यकर्ते म्हणून सुनील जगताप यांची ठसठशीत ओळख आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे.

शिक्षकांच्या आलेल्या एका फोनवर शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य, शिक्षण संचालक कार्यालय, शिक्षण उपसंचालक कार्यालय, शिक्षणाधिकारी माध्यमिक,प्राथमिक या ठिकाणी जाऊन शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचे महत्त्वपूर्ण काम जगताप यांनी केले आहे. शिक्षकांना दिली जाणारी शालाबाह्य कामे, संच मान्यता,जूनी पेन्शन योजना यामुळे निर्माण झालेले प्रश्न, शिक्षकांवर लादलेली टीइटी परीक्षा,अशा अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सुनील जगताप हे शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading