Saturday, August 29, 2026
BusinessLatest News

आधार हाऊसिंग फायनान्सकडून आषाढी वारीदरम्यान विश्रांती कक्ष आणि जनजागृती उपक्रम

पुणे : सामाजिक कल्याण आणि सकारात्मक सामाजिक प्रभावासाठी आपली कटिबद्धता अधिक दृढ करत आधार हाऊसिंग फायनान्स पंढरपूर वारीमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांना त्यांच्या प्रवासातील अडचणी दूर करण्याकरिता विश्रांती कक्ष उभारले असून त्याचबरोबर जनजागृती उपक्रम देखील राबवण्यात येत आहेत.

दरवर्षी, लाखो वारकरी कडक ऊन आणि मुसळधार पावसाची पर्वा न करता विठ्ठलाच्या दर्शनासाठी अत्यंत कठीण प्रवास करतात, ज्‍यामधून त्‍यांचा दृढ विश्वास, स्थिरता आणि भक्तीचे दर्शन होते. या यात्रेतील शारीरिक श्रमाची जाणीव ठेवून आधार हाऊसिंग फायनान्सने वारकऱ्यांसाठी १०० विश्रांती कक्ष उपलब्ध करून दिले आहेत, जे यात्रेदरम्यान भाविकांना विश्रांतीची सुविधा देतात, ज्‍यामुळे ते आपली आध्यात्मिक यात्रा पुढे सुरू ठेवण्यापूर्वी काही वेळ आरामात विश्रांती घेऊ शकतील.


सायंकाळी वारकरी विश्रांती घेत असतात, तेव्हा कंपनीने सर्जनशील पथनाट्याद्वारे शैक्षणिक जनजागृती उपक्रम देखील सुरू केला आहे. या उपक्रमासाठी खास लिहिलेले पथनाट्य एका कुटुंबाच्या प्रवासाभोवती फिरते, ज्यांचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न होते, पण पैशांच्या अभावामुळे त्यांना स्‍वप्न साकारताना काही अडचणींचा सामना करावा लागला. केवळ कठोर परिश्रम आणि योग्य आर्थिक मार्गदर्शनाच्या जोरावर ते कुटुंब आपले स्वप्न पूर्ण करण्यात कसे यशस्वी होते, हे या नाटकात दाखवले आहे. याव्यतिरिक्त, या पथनाट्याचे कव्हरेज प्रसिद्ध मराठी इन्फ्लुएन्सर चॅनेल भडिपा द्वारे केले जात आहे, जे वारकऱ्यांशी संवाद साधून, त्यांचा वारीचा अनुभव आणि त्यांच्या घरमालकीचा प्रवास समजून घेऊन हा उपक्रम अधिक लक्षवेधक बनवत आहे.

या पथनाट्याचे प्रयोग ९ जुलै रोजी नाना पेठ, पुणे, १५ जुलै रोजी लोणंद आणि २४ जुलै रोजी पंढरपूर येथे होणार आहेत. या उपक्रमाचा सांस्कृतिकदृष्ट्या संबंधित गोष्टीच्या माध्यमातून लोकांशी जोडले जाण्‍याचा आणि किफायतशीर हाऊसिंग फायनान्सबद्दल अधिक जागरूकता निर्माण करण्‍याचा मनसुबा आहे.
याप्रसंगी मत व्‍यक्त करत आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे एमडी आणि सीईओ रिषी आनंद म्हणाले, “आषाढी वारी चिकाटी आणि निष्ठेची उत्कट अभिव्यक्ती आहे, जिने अनेक पिढ्यांपासून विविध समुदायांना एकत्र आणले आहे. आधार हाऊसिंग फायनान्समध्ये आम्हाला वारकऱ्यांना त्यांच्या प्रवासादरम्यान विश्रांती घेता येईल आणि त्यांचा थकवा दूर करता येईल अशी जागा उपलब्ध करून देऊन मदत करण्याचे भाग्य लाभले आहे. विश्रांतीसाठी बांधण्‍यात आलेले तंबू आणि पथनाट्याच्या माध्यमातून आम्ही भाविकांना आराम व जवळीक या दोन्ही गोष्टी देण्याची आशा करतो. प्रबळ समुदाय निर्माण करण्यासाठी कटिबद्ध कंपनी म्‍हणून आमचा विश्वास आहे की, काळजीपोटी घेतलेले छोटेसे पाऊल देखील आम्ही सेवा देत असलेल्या व्‍यक्तींच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणू शकते.”

कंपनी दरवर्षी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांचा आराम, सुरक्षितता आणि कल्याण वाढवण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबवते. आवश्यक सुविधा पुरवणे असो, विश्रांतीसाठी जागा तयार करणे असो किंवा अर्थपूर्ण सामुदायिक उपक्रमांद्वारे वारकऱ्यांशी जोडले जाणे असो नेहमी उत्तम सुविधा देते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading