Saturday, June 13, 2026
Latest NewsLIFESTYLE

प्रारंभ चित्रप्रदर्शन १९ ऑगस्ट पासून

पुणे  : गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना गणरायाच्या भावनिक आणि प्रतीकात्मक रूपाचे दर्शन घेण्याची संधी पुणेकर रसिकांना मिळणार आहे. निमित्त आहे चित्रकार राजेश केदारे यांच्या ‘प्रारंभ’ या एकल चित्रप्रदर्शनाचे. आज (१९ ऑगस्ट) पासून रविवार २४ ऑगस्ट दरम्यान घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथील राजा रवी वर्मा कलादालन येथे सकाळी ११ ते सायं ७ दरम्यान हे प्रदर्शन रसिकांना पाहता येणार असून ते सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.

राजेश केदारे यांच्या या पहिल्याच चित्रप्रदर्शनात गणेशाचे लोभस रूप पहायला मिळणार असून याद्वारे गणरायाची अनेक रूपे रसिकांसमोर येतील. भावना, परंपरा आणि कल्पनाशक्तीचा संगम या चित्रांमध्ये पहायला मिळेल. गणेशाचे केवळ बाह्य रूप नव्हे तर त्यांची अनेकविध ठिकाणी जाणविणारी उपस्थिती या चित्रांमधून मांडण्याचा प्रयत्न केदारे यांनी केला आहे. या प्रदर्शनाद्वारे विविध भाव, घटना, विधी, उत्सव यावर आधारित विविध मूर्त आणि अमूर्त स्वरूपाचे कधीही न पाहिलेले गणपती बाप्पाचे अनोखे चित्रण  रसिकांना अनुभविता येतील. प्रदर्शनामध्ये जलतरंग व अॅक्रॅलिक यांचा समावेश असेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading