Thursday, June 4, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छा

 

वाढदिवसानिमित्त केली तोंड भरून तारीफ

मुंबई: प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या शुभेच्छा संदेशात शिंदे यांनी दोन्ही नेत्यांच्या गुणवैशिष्ट्यांचा ठळक उल्लेख करीत त्यांची तोंड भरून तारीफ केली आहे.

विश्वासाचा हात असू दे, मैत्रीचा सहवास असू दे; महाराष्ट्राच्या उद्धाराचा रात्रंदिन हा ध्यास असू दे

महाराष्ट्राच्या विकासयात्रेचे बिनीचे शिलेदार मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना जन्मदिनाच्या उदंड शुभेच्छा!

अशा शब्दात शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वसमावेशक नेते, अव्वल मित्र आणि सहकारी, अर्थशास्त्राची जाण, प्रशासनावर पकड असलेले, जनतेचा आवाज बुलंद करणारे नेते, असे फडणवीस यांचे वर्णन शिंदे यांनी केले आहे.

महायुतीला भक्कमपणे साथसंगत करणाऱ्या उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांना जन्मदिनाच्या अनेक शुभेच्छा!

अशा शब्दात अजित पवार यांना शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. प्रशासनावर कमालीची पकड, अर्थशास्त्राची उत्तम जाण, डोळस विकासाचा ध्यास, संवेदनशील व वक्तशीर नेता, असे पवार यांच्याबद्दल शिंदे यांनी म्हटले आहे.

कोणताही उत्सव, कार्यक्रम नको

आपल्या वाढदिवसानिमित्त कोणतेही उत्सव साजरे करू नये, कार्यक्रम आयोजित करू नये, अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आणि भारतीय जनता पक्षाने देखील नेत्या, कार्यकर्त्यांना केली आहे. त्या ऐवजी मुख्यमंत्री असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे.

अजितदादा भावी मुख्यमंत्री

अजित पवार यांची सासरवाडी असलेल्या धाराशिव शहरात देखील वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देणारे फलक जागोजागी लागले आहेत. मात्र, प्रमुख वर्दळीच्या जागी लावण्यात आलेले, ‘अजितदादा भावी मुख्यमंत्री,’ या मजकुराचे फलक लक्ष वेधून घेणारे ठरले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading