Thursday, June 4, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मुंबई महापालिका महायुती एकत्रित लढणार

इतर ठिकाणीही एकत्र लढण्याचे दिल्लीतून आदेश

मुंबई: प्रतिनिधी

मुंबई महापालिकेच्या निवडणुका महायुती एकत्रितपणे लढणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बरोबर घेण्याचे स्पष्ट आदेश दिल्लीतून भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

मुंबई महापालिकेतील जागावाटप आणि रणनीती निश्चित करण्यासाठी महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे नेते, अर्थात मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री लवकरच दिल्ली येथे जाणार आहेत.

राज्यात इतर ठिकाणी देखील, विशेषतः महापालिका क्षेत्रातील निवडणुका महायुती म्हणून एकत्रित लढाव्या, अशा सूचना देखील भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून राज्य शाखेला देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच त्या पद्धतीचे संकेत दिले आहेत.

रिपब्लिकन पक्षाचे करणार काय?

रिपब्लिकन पक्ष आठवले गट हा देखील महायुतीतील घटक पक्ष आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या मतांमध्ये आपल्या पक्षाचे योगदान असल्याचा दावा आठवले आणि इतर नेत्यांकडून वारंवार केला गेला आहे. मात्र, या दोन्ही निवडणुकीत जागा वाटपाच्या वेळी रिपब्लिकन पक्षाचा विचार करण्यात आला नाही. महापालिका निवडणुकीत मुंबई, पुण्यासह अन्य ठिकाणी काही नगरसेवक पदे आणि उपमहापौर पद आपल्या पक्षाला मिळावे, अशी आठवले यांची मागणी आहे. या मागणीला महायुतीतील प्रमुख पक्षांकडून काय प्रतिसाद मिळणार, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading