प्रिसिजन–इंजिनिअर्ड घटकांचे उत्पादन करणाऱ्या ओमनीटेक इंजिनिअरिंग लिमिटेडने प्राथमिक समभाग विक्रीद्वारे (आयपीओ) 850 कोटी रु. चा निधी उभारण्यासाठी भांडवली बाजार नियंत्रक सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) सादर केला आहे. डीआरएचपी मध्ये नमूद केल्यानुसार आयपीओ मध्ये 520 कोटी रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू आणि प्रवर्तक उदयकुमार अरुणकुमार पारेख यांच्याकडून 330 कोटी रु. मूल्याची ऑफर फॉर सेल (OFS) यांचा समावेश आहे. कंपनी 104 कोटी रु. च्या प्री– आयपीओ शेअर प्लेसमेंटची योजना करत आहे. जर ही प्री– आयपीओ प्लेसमेंट पूर्ण झाली तर फ्रेश इश्यूचा आकार तितक्याच प्रमाणात कमी केला जाईल. फ्रेश इश्यूमधून उभारण्यात येणारा निधी कर्ज परतफेड, दोन नवीन उत्पादन केंद्रांची स्थापना, भांडवली खर्चासाठी आवश्यक निधी आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्ट यासाठी वापरण्यात येईल. ओमनीटेक इंजिनिअरिंग ही उच्च–प्रेसिजन इंजिनिअर्ड घटकांची निर्मिती करते आणि ऊर्जा, मोशन कंट्रोल आणि ऑटोमेशन, औद्योगिक उपकरण प्रणाली, तसेच इतर विविध औद्योगिक उपयोजनांसाठी जागतिक ग्राहकांना पुरवठा करते कंपनीच्या ग्राहकांमध्ये हॅलिबर्टन एनर्जी सर्व्हिसेस, सुझलॉन, ऑशकॉश एअरोटेक, वेदरफोर्ड, लफ्किन इंडस्ट्रीज, ऑइलगिअर, डोनाल्डसन कंपनी, PUSH इंडस्ट्रीज आणि भारत एअरोस्पेस मेटल्स यांचा समावेश आहे. ओमनीटेक तर्फे अमेरिका, यूएई, जर्मनी, बल्गेरिया आणि स्वीडन सहित 22 देशांतील 220 हून अधिक ग्राहकांना कस्टमाइझ्ड उच्च–प्रेसिजन घटक पुरवले आहेत. कंपनीचे समभाग बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध केले जाण्याचा प्रस्ताव आहे. या आयपीओसाठी इक्वीरस कॅपिटल आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीज हे बुक–रनिंग लीड मॅनेजर्स आहेत, तर एमयूएफजी इनटाईम इंडिया (पूर्वीचे लिंक इनटाईम इंडिया) हे आयपीओ चे रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहेत.
Read More