Wednesday, May 20, 2026
BusinessLatest News

ओमनीटेक इंजिनिअरिंग लिमिटेड तर्फे सेबीकडे डीआरएचपी सादर

 

प्रिसिजनइंजिनिअर्ड घटकांचे उत्पादन करणाऱ्या ओमनीटेक इंजिनिअरिंग लिमिटेडने प्राथमिक समभाग विक्रीद्वारे (आयपीओ) 850 कोटी रुचा निधी उभारण्यासाठी भांडवली बाजार नियंत्रक सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपीसादर केला आहे.

डीआरएचपी मध्ये नमूद केल्यानुसार आयपीओ मध्ये 520 कोटी रुपर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू आणि प्रवर्तक उदयकुमार अरुणकुमार पारेख यांच्याकडून 330 कोटी रुमूल्याची ऑफर फॉर सेल (OFS) यांचा समावेश आहे.

कंपनी 104 कोटी रुच्या प्री आयपीओ शेअर प्लेसमेंटची योजना करत आहेजर ही प्री आयपीओ प्लेसमेंट पूर्ण झाली तर फ्रेश इश्यूचा आकार तितक्याच प्रमाणात कमी केला जाईल.

फ्रेश इश्यूमधून उभारण्यात येणारा निधी कर्ज परतफेडदोन नवीन उत्पादन केंद्रांची स्थापनाभांडवली खर्चासाठी आवश्यक निधी आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्ट यासाठी वापरण्यात येईल.

ओमनीटेक इंजिनिअरिंग ही उच्चप्रेसिजन इंजिनिअर्ड घटकांची निर्मिती करते आणि ऊर्जामोशन कंट्रोल आणि ऑटोमेशनऔद्योगिक उपकरण प्रणालीतसेच इतर विविध औद्योगिक उपयोजनांसाठी जागतिक ग्राहकांना पुरवठा करते

कंपनीच्या ग्राहकांमध्ये हॅलिबर्टन एनर्जी सर्व्हिसेससुझलॉन, ऑशकॉश एअरोटेकवेदरफोर्डलफ्किन इंडस्ट्रीजऑइलगिअरडोनाल्डसन कंपनी, PUSH इंडस्ट्रीज आणि भारत एअरोस्पेस मेटल्स यांचा समावेश आहे.

ओमनीटेक तर्फे अमेरिका, यूएई, जर्मनी, बल्गेरिया आणि स्वीडन सहित 22 देशांतील 220 हून अधिक ग्राहकांना कस्टमाइझ्ड उच्चप्रेसिजन घटक पुरवले आहेत.

कंपनीचे समभाग बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध केले जाण्याचा प्रस्ताव आहे.

या आयपीओसाठी इक्वीरस कॅपिटल आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीज हे बुकरनिंग लीड मॅनेजर्स आहेततर एमयूएफजी इनटाईम इंडिया (पूर्वीचे लिंक इनटाईम इंडियाहे आयपीओ चे रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading