फ्रेश इश्यू द्वारे 468 कोटी रुपये उभारण्यासाठी वेकफिट इनोव्हेशन्स लिमिटेडने सेबीकडे सादर केला डीआरएचपी
डीआरएचपी लिंक:
https://nsearchives.nseindia.com/corporate/Registration_27062025055322_DRHP.pdf
आर्थिक वर्ष 2024 मध्ये महसुलाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठी D2C घरगुती व फर्निशिंग्ज कंपनी वेकफिट इनोव्हेशन्स लिमिटेडने रेडसीर अहवालानुसार भांडवली बाजार नियामक सेबी कडे प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) च्या माध्यमातून निधी उभारण्यासाठी ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) सादर केला आहे.
डीआरएचपी नुसार, या बेंगळुरुस्थित कंपनीचा प्रस्तावित आयपीओ हा 468.2 कोटी रुपयांपर्यंत इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू आणि 5.84 कोटी शेअर्सच्या विक्री प्रस्ताव (ऑफर फॉर सेल) यांचे मिश्रण आहे.
या OFS चा एक भाग म्हणून प्रवर्तक अंकित गर्ग आणि चैतन्य रामलिंगगोवडा तसेच इतर विक्री समभागधारक नितिका गोयल, पीक XV पार्टनर्स इन्व्हेस्टमेंट्स VI, रेडवूड ट्रस्ट, व्हर्लिनवेस्ट S.A., एसएआय ग्लोबल इंडिया फंड I LLP, इन्वेस्टकॉर्प ग्रोथ इक्विटी फंड, इन्वेस्टकॉर्प ग्रोथ अपॉर्च्युनिटी फंड आणि पॅरामार्क केबी फंड I हे शेअर्स ऑफलोड करणार आहेत.
वेकफिटने या फ्रेश इश्यू (Fresh Issue) मधून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा उपयोग 82 कोटी रुपयांच्या भांडवली खर्चासाठी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामध्ये 117 नवीन COCO रेग्युलर दालन आणि एक COCO – जंबो दालन उभारण्यासाठीचा खर्च समाविष्ट आहे; नवीन उपकरणे व यंत्रसामग्री खरेदीसाठी 15.4 कोटी रुपये; विद्यमान स्टोअर्ससाठी भाडेपट्टी, सब-लीज भाडे व परवाना शुल्काच्या खर्चासाठी 145 कोटी रुपये; ब्रँडविषयी जाणीवजागृती आणि दृश्यमानता वाढवण्यासाठी मार्केटिंग व जाहिरात खर्चासाठी 108.4 कोटी रुपये आणि उर्वरित रक्कम सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी वापरण्यात येईल.
वेकफिट ही कंपनी 31 मार्च 2024 पर्यंतच्या स्थितीनुसार 2016 मध्ये स्थापन झाली असून भारतातील घरगुती व फर्निशिंग्ज क्षेत्रात 1,000 कोटी रु. पेक्षा जास्त एकूण उत्पन्न गाठणारी सर्वात वेगाने वाढणारी स्थानिक कंपनी आहे.
कंपनीकडे गाद्या, फर्निचर आणि फर्निशिंग्ज यांची विस्तृत श्रेणी आहे. स्वतःच्या चॅनेल्सद्वारे (त्यामध्ये वेबसाइट आणि COCO स्टोअर्स यांचा समावेश आहे) तसेच बाह्य चॅनेल्सद्वारे (प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आणि मल्टी-ब्रँड आउटलेट्ससह विविध मार्केटप्लेस) ते आपल्या उत्पादनांची विक्री करतात.
वेकफिटचे पाच उत्पादन युनिट्स आहेत. त्यापैकी दोन बंगळुरु, कर्नाटकमध्ये, दोन होसूर, तामिळनाडूमध्ये आणि एक सोनीपत, हरियाणामध्ये आहे. ही सर्व युनिट्स आयात केलेल्या यंत्रसामग्री व स्वयंचलित तंत्रज्ञानाने सुसज्ज असून यामध्ये रोबोटिक आर्म्स आणि रोलर बेल्ट्स यांचा समावेश आहे. ते उत्पादन प्रक्रियेतील कार्यक्षमता वाढवतात व अपव्यय कमी करतात.
वेकफिट ने आर्थिक वर्ष 24 मध्ये 986.3 कोटी रुपये आणि 31 डिसेंबर 2024 रोजी संपलेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत 971 कोटी रुपये महसूल नोंदवला आहे.
ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड, आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड आणि नोमुरा फायनान्शियल अॅडव्हायझरी अँड सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड हे या आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत. कंपनीचे इक्विटी शेअर्स बीएसई आणि एनएसईवर लिस्ट करण्यात येणार आहेत.
