Thursday, June 4, 2026
Latest NewsPUNE

पुणे पोलिसांची बांगलादेशी शोध मोहीम

 

देहविक्री करणाऱ्या 13 महिला बुधवार पेठेतून घेतल्या ताब्यात

पुणे प्रतिनिधी

पुणे पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांच्या शोधाची मोहीम हाती घेतली असून त्या अंतर्गत बुधवार पेठेत देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या 13 महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यांना बांगलादेशात परत पाठवण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी दिली.

पुणे पोलिसांनी घुसखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक स्थापन केले आहे. या पथकाने आपले काम सुरू केले असून आतापर्यंत बुधवार पेठेतील वेश्या वस्तीमध्ये देहविक्रय करणाऱ्या 13 बांगलादेशी महिला ताब्यात घेतल्या आहेत.

या महिला आपण पश्चिम बंगाल मधून येऊन स्वखुशीने वेश्याव्यवसाय करीत असल्याचे सांगतात. मात्र, अधिक चौकशी केली असता त्या बांगलादेशी असल्याचे आढळून येते. अशा महिलांप्रमाणेच अनेक बांगलादेशी पुरुष देखील घुसखोरी करून पुण्यात आले आहेत. डेक्कन जिमखाना परिसर, फर्गसन महाविद्यालय रस्ता आणि शहराच्या विविध भागात अशा घुसखोरांचा शोध घेतला जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading