Thursday, June 4, 2026
Latest NewsPUNE

जाधवर ‘नर्सिंग इन्स्टिट्यूट’ च्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान

परिमल-प्रमोद चौधरी फाउंडेशनकडून २.५ लाखांहून अधिक रकमेच्या फेलोशिप

पुणे – कै. उद्धवराव तुळशीराम जाधवर फाउंडेशनच्या इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने २.५ लाखांहून अधिक रकमेच्या फेलोशिप्स पात्र आणि गुणवंत विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आल्या.

फेलोशिप प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये तृतीय वर्षातील पायल निकम व मोहिनी वाळुंज यांना प्रत्येकी ५२ हजार ५०० रुपये इतकी रक्कम देण्यात आली. तसेच द्वितीय वर्षातील साक्षी काकडे, विद्या चवरे आणि स्नेहल दळवी या तिघींना प्रत्येकी ५६ हजार रुपयांची फेलोशिप प्रदान करण्यात आली.

ॲड.शार्दुल जाधवर म्हणाले, या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीने व गुणवत्तेने ही शिष्यवृत्ती मिळवली आहे. ही मदत केवळ आर्थिक सहाय्य नसून विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील आत्मविश्वासाला आणि प्रेरणेला दिलेला हात आहे. ही फेलोशिप विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रवासाला गती देणार असून, आरोग्यसेवेत काम करण्याची त्यांची जिद्द व निर्धार अधिक बळकट करणारी ठरणार आहे. नर्सिंग क्षेत्रातील उद्याचे आरोग्यसेवक घडवण्यासाठी दिलेल्या पाठिंब्यासाठी परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे विशेष आभार इन्स्टिट्यूट च्या वतीने मानण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading