Thursday, September 17, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

‘माणिकराव कोकाटे यांचाही राजीनामा घ्या’ छावा संघटनेची अजित पवार यांच्याकडे मागणी

 

लातूर: प्रतिनिधी

छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण करणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या प्रमाणेच विधिमंडळात पत्ते खेळणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचाही राजीनामा घ्यावा, अशी मागणी छावा संघटनेने केली आहे. त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदाच्या भवितव्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

माणिकराव कोकाटे अधिवेशन काळात विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळत असतानाचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रसिद्ध केला आहे. त्यानंतर विरोधक आणि सामाजिक संस्था संघटना यांच्यावर टीकेची झोड उठवत आहेत.

खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणी आपली नाराजी व्यक्त केली आहे. सभागृहाचे कामकाज सुरू असताना आपला विषय नसला तरी गांभीर्य राखणे महत्वाचे आहे, असे सांगत त्यांनी कोकाटे यांची कान उघाडणी केली आहे. त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदाबाबत शंका घेण्यास अधिक वाव निर्माण होत आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील कोकाटे यांच्यासह संजय गायकवाड, संजय शिरसाट, योगेश कदम यांच्या हकालपट्टीसाठी लढा उभारण्याचा इशारा दिला आहे.

कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी, पक्षाचे अध्यक्ष व वरिष्ठ नेते निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading