Thursday, June 4, 2026
BusinessLatest News

ब्रिगेड हॉटेल व्हेंचर्स लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) गुरुवार, 24 जुलै 2025 रोजी होणार सुरू

  • प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअरसाठी किंमत पट्टा 85 रु. ते 90 रु.  इतका निश्चित
  • बोली / इश्यू सुरू होण्याचा दिनांक – गुरुवार, 24 जुलै 2025 आणि बोली / इश्यू समाप्त होण्याचा दिनांक – सोमवार, 28 जुलै 2025
  • प्रमुख गुंतवणूकदार बोली दिनांक – बोली/इश्यू सुरू होण्याच्या एक कार्यदिवस आधी, म्हणजे बुधवार, 23 जुलै 2025
  • किमान 166 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 166 च्या पटीत बोली लावता येईल
  • कर्मचारी आरक्षित कोट्यात बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांसाठी प्रति इक्विटी शेअर 3 रु. इतकी सवलत दिली जाईल
  • आरएचपी लिंक: https://bhvl.in/red-herring-prospectus/

 

राष्ट्रीय : ब्रिगेड हॉटेल व्हेंचर्स लिमिटेड (“कंपनी”) गुरुवार, 24 जुलै 2025 रोजी आपल्या प्राथमिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) अनुषंगाने बोली /इश्यू सुरू करणार आहे. प्रमुख गुंतवणूकदार बोली दिनांक – बोली/इश्यू सुरू होण्याच्या एक कार्यदिवस आधी, म्हणजे बुधवार, 23 जुलै 2025 आहे. बोली / इश्यू समाप्त होण्याचा दिनांक – सोमवार, 28 जुलै 2025 आहे.

या इश्यूमध्ये प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू असून त्यांचे  एकूण मूल्य 759.60 कोटी रु. इतके आहे.

इश्यूचा किंमत पट्टा 85 रु. ते 90 रु. प्रति इक्विटी शेअर इतका निश्चित करण्यात आला आहे.

या इश्यूमध्ये पात्र कर्मचाऱ्यांसाठी 75.96 दशलक्ष रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे आरक्षण करण्यात आले आहे (“कर्मचारी आरक्षित हिस्सा”). पात्र कर्मचाऱ्यांना या कोट्यात प्रति शेअर 3 रु. ची सवलत दिली जाणार आहे (“कर्मचारी आरक्षण हिस्सा सवलत”).

तसेच, BEL शेअरहोल्डर्ससाठी 303.84 दशलक्ष रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे प्रमाणानुसार आरक्षण असेल (“BEL समभागधारक आरक्षण हिस्सा”). कर्मचारी आरक्षण कोटा आणि BEL शेअरहोल्डर्स आरक्षण कोटा वगळून उरलेला इश्यू भाग “Net Issue” म्हणून ओळखला जाईल.

[बोली किमान 166 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 166 च्या पटीत लावता येईल (“Bid Lot”).] यामधून मिळणारी रक्कम कंपनी आणि तिच्या मटेरियल सबसिडियरी SRP प्रॉस्पेरिटा हॉटेल व्हेंचर्स लिमिटेड यांनी घेतलेल्या काही कर्जाचे पूर्णतः किंवा अंशतः आगाऊ भरणा/परतफेड करण्यासाठी, एकूण 4681.4 दशलक्ष रु. इतकी रक्कम वापरण्यात येणार आहे. यामध्ये कंपनीने घेतलेले 4136.9 दशलक्ष रु. आणि मटेरियल सबसिडियरीने घेतलेले 544.5 दशलक्ष रु. यांचा समावेश आहे.

प्रमोटर BEL कडून जमीन खरेदीसाठी विचाराधीन रक्कम 1075.2 दशलक्ष रु. भरण्यासाठी

अशा अजून न ठरलेल्या अधिग्रहणांद्वारे इनऑर्गॅनिक वाढ, इतर धोरणात्मक उपक्रम व सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टासाठी या आयपीओ मधून मिळणारी रक्कम वापरली जाणार आहे.

ही ऑफर SCRR च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली  जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR सुधारित 2018 नियम 6(2) च्या नियमनात आहे. त्या अंतर्गत SEBI ICDR नियमांनुसार, ऑफरच्या 75% पेक्षा कमी नसलेला भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“QIBs” आणि तो हिस्सा “QIB Portion”) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि आपली कंपनी, BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“Anchor Investor Portion”) वाटप करू शकते. त्यापैकी किमान एक तृतीयांश हिस्सा देशांतर्गत स्थानिक म्युच्युअल फंडांसाठी उपलब्ध राहील. त्यासाठी स्थानिक म्युच्युअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमतीच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीसाठी वैध बोली प्राप्त व्हायला लागतील. जर प्रमुख गुंतवणूकदार भागामध्ये कमी सदस्यता किंवा वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स नेट QIB Portion मध्ये समाविष्ट केले जातील.

ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. तथापि, जर म्युच्युअल फंडांकडून एकूण मागणी QIB Portion च्या 5% पेक्षा कमी असेल, तर म्युच्युअल फंड भागात वाटपासाठी उपलब्ध असलेले उर्वरित इक्विटी शेअर्स उरलेल्या QIB Portion मध्ये समाविष्ट करून QIBs साठी प्रमाणात वाटप केले जाईल. जर किमान 75% इश्यूचे वाटप QIBs (पात्र संस्थात्मक खरेदीदार) यांना करता आले नाहीतर संपूर्ण अर्ज रक्कम त्वरित परत केली जाईल. तसेच, ऑफरच्या 15 टक्क्यांपेक्षा जास्त नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. त्यापैकी (अ) एक तृतीयांश भाग 200,000 रु.  पेक्षा जास्त आणि 1,000,000 रु. पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि (ब्) दोन तृतीयांश भाग 1,000,000 रु..पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वर नमूद केलेल्या कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग दुसऱ्या इतर उप-श्रेणीतील गुंतवणूकदारांना वाटप केलेला असू शकतो. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल. पुढे, सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार ऑफरच्या 10 % पेक्षा जास्त नसलेला भाग रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांना उपलब्ध होईल. ऑफर प्राइस इतक्या किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या बोलीवर हे लागू असेल. प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही. याशिवाय, पात्र कर्मचाऱ्यांनी कर्मचारी आरक्षित हिस्सा अंतर्गत अर्ज केल्यास त्यांना इक्विटी शेअर्सचे वाटप प्रमाणानुसार (proportionate basis) करण्यात येईल. अर्थात त्यासाठी त्यांनी लावलेली बोली इश्यू प्राइस इतकी किंवा त्याहून अधिक असणे गरजेचे आहे. 303.84 दशलक्ष रु. पर्यंत एकूण रकमेचे इक्विटी शेअर्स फक्त BEL Shareholders Reservation Portion अंतर्गत अर्ज करणाऱ्या BEL शेअरहोल्डर्सना, त्यांनी लावलेली बोली इश्यू प्राइस इतकी किंवा त्याहून अधिक असल्यास, प्रमाणानुसार वाटपासाठी उपलब्ध करून दिले जातील. प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही. येथून पुढे, पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या कर्मचारी आरक्षण भागांतर्गत अर्ज करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना आणि BEL Shareholders Reservation Portion अंतर्गत अर्ज करणाऱ्या BEL शेअरहोल्डर्सना त्यांची वैध बोली ऑफर किंमती एवढी किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास इक्विटी शेअर्सचे प्रमाणात वाटप केले जाईल.

प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही.

जेएम फायनान्शियल लिमिटेड आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (BRLMs) आहेत.

येथे वापरल्या गेलेल्या परंतु परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइज्ड शब्दांचा अर्थ आरएचपी मध्ये नमूद केल्यासारखाच असेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading