विमान नगर येथील लुंकड झोडीयाक  सोसायटी कडून कोविड सेंटरला मदत, कोरोना योद्ध्यांचा सन्मान

पुणे- विमाननगर रहिवाशांकडून व लुंकड झोडियाक सोसायटीतील सभासदांकडून विमाननगर  कोव्हीड केअर सेंटर मध्ये काम करणार्‍या सेवकवर्गाचा  “करोना योध्दयांचा” सत्कार समारंभ व कोव्हीड सेंटरला आवश्यक  वैद्यकीय साहित्य वाटप नुसतेच करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून कोविड सेंटर मधील काम करणाऱ्या सेवकांमध्ये एक नवी उमेद निर्माण करून त्यांच्या कामाला प्रोत्साहन देण्याचा उद्देश होता.सोसायटीचे अध्यक्ष रुप चंचलानी सचिव संतोष सुरेशबाबू पवार यांनी यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. या प्रसंगी महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी कार्यकारी अभियंता सुनिल यादव , उपअभियंता शंकर दुदूस्कर , वैद्यकीय अधीक्षक. डॉ. संगीता भारती, डॉ. स्वाती माळी. डॉ.स्वाती पाटील, कार्यालय अधीक्षक संजय खाडे, अभियंता दत्तात्रेय चव्हाण, अशोक सांगडे, जैन संघटनेचे एस आर पवार उपस्थित होते. 

Leave a Reply

%d bloggers like this: