Monday, June 22, 2026
BusinessLatest News

महिंद्रा फार्म इक्विपमेंट बिझनेसतर्फे 70 लाख ट्रॅक्टर्सच्या उत्पादनाचा महत्वपूर्ण टप्पा पार

मुंबई महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या आणि उत्पादनाच्या प्रमाणानुसार जगातील सर्वात मोठ्या ट्रॅक्टर उत्पादक असलेल्या महिंद्रा फार्म इक्विपमेंट बिझनेस (FEB) ने 70 लाख कृषी ट्रॅक्टर्सच्या उत्पादनाचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहेही कामगिरी म्हणजे कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्याच्या आणि भारतासह जगभरातील लाखो शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून योगदान देण्याच्या महिंद्राच्या प्रवासातील एक महत्त्वाचे पाऊल आहे.

भारतातील मजबूत उत्पादन क्षमतेचा ठसा आणि जागतिक स्तरावरील भक्कम स्थान यांच्या बळावरमहिंद्रा FEB आपल्या उत्पादनांचे महिंद्रा ट्रॅक्टर्स आणि स्वराज ट्रॅक्टर्स या ब्रँड्सअंतर्गत तसेच ट्रॅकस्टार आणि हिंदुस्तान या ट्रॅक्टर मालिकांची उत्पादक ग्रोमॅक्सच्या माध्यमातून विकास आणि विक्री करतेकंपनीकडे उद्योगातील सर्वाधिक व्यापक ट्रॅक्टर पोर्टफोलिओंपैकी एक असूनत्यात 350 हून अधिक मॉडेल्स आणि विविध प्रकारांचा समावेश आहेयासोबतच ट्रॅक्टरद्वारे चालविल्या जाणाऱ्या आणि स्वयंचलित कृषी यंत्रसामग्रीची वाढती श्रेणीही उपलब्ध आहे.

1963 मध्ये स्थापन झालेली महिंद्रा ट्रॅक्टर्स कंपनी हा भारतातील क्रमांक ट्रॅक्टर ब्रँड आहेकंपनीची उत्पादन केंद्रे मुंबईनागपूरझहीराबादरुद्रपूरजयपूर आणि राजकोट येथे असूनसंशोधन  विकास (R&D) केंद्र चेन्नई येथील एमआरव्ही येथे आहेपूर्वी पंजाब ट्रॅक्टर्स लिमिटेड म्हणून ओळखला जाणारा स्वराज ट्रॅक्टर्स हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा ट्रॅक्टर ब्रँड असूनसातत्यपूर्ण विक्री वाढ आणि शेतकरी समुदायाशी असलेल्या मजबूत नात्याच्या जोरावर गेल्या दशकात देशातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या ट्रॅक्टर कंपन्यांपैकी एक म्हणून उदयास आला आहे1974 मध्ये देशातील पहिला स्वदेशी ट्रॅक्टर विकसित केल्याचे श्रेय स्वराजला जातेमोहाली येथे उत्पादन प्रकल्पफाउंड्री आणि संशोधन  विकास सुविधा यांच्या माध्यमातून स्वराजने भक्कम स्थान निर्माण केले आहेग्रोमॅक्स अॅग्री इक्विपमेंट लिमिटेडही एम अँड एम लिमिटेड आणि गुजरात सरकार यांच्यातील 60:40 संयुक्त उपक्रम कंपनी असूनवडोदरा येथून कार्यरत आहे आणि भारतातील पहिल्या क्रमांकाचा प्रादेशिक ट्रॅक्टर ब्रँड आहे.

हा टप्पा महिंद्रा FEB च्या उत्पादन नाविन्यपूर्णता आणि जागतिक दर्जाच्या उत्पादन क्षमतेतील मजबूत प्रगतीवर आधारित आहेआर्थिक वर्ष 26 मध्ये कंपनीने 526,000 हून अधिक ट्रॅक्टर्सची विक्रमी वार्षिक विक्री नोंदवलीयाशिवाय महिंद्रा 585 YUVO TECH+ V1, महिंद्रा NOVO प्रीमियम एडिशन आणि स्वराज प्रोटेक यांसारखी नवीन उत्पादने सादर करण्यात आलीतसेच महिंद्रा OJA चा प्रमुख जागतिक बाजारपेठांमध्ये विस्तार करण्यात आलाआर्थिक वर्ष 27 मध्ये महिंद्रा FEB नव्या महिंद्रा ट्रॅक्टर श्रेणी आणि स्वराज प्रोटेक श्रेणीअंतर्गत नवीन ट्रॅक्टर्स आणि 12 नवीन वैशिष्ट्ये सादर करणार आहे.

या यशाबद्दल भाष्य करताना एम अँड एम लिमिटेडच्या ऑटो अँड फार्म इक्विपमेंट बिझनेस (AFS)चे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश जेजुरीकर म्हणाले, “आपला देश विकसित भारताच्या आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत असताना कृषी क्षेत्राचे रूपांतर हे राष्ट्रनिर्मितीच्या केंद्रस्थानी राहीलमहिंद्रा मध्ये आमचे ट्रॅक्टर्स ग्रामीण समुदायांना बळकट करत असून दीर्घकालीन राष्ट्रीय विकासाला पाठबळ देत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे70 लाख ट्रॅक्टर्सचा हा टप्पा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे आणि आम्ही भविष्यासाठी सातत्याने कार्य करत राहू.

एम अँड एम लिमिटेडच्या फार्म इक्विपमेंट बिझनेसचे अध्यक्ष विजय नाकरा म्हणाले, “70 लाखांचा हा टप्पा केवळ आमच्या उत्पादनाच्या प्रमाणाचे प्रतीक नाहीतर शेतीविषयीची आमची सखोल बांधिलकी आणि शेतकऱ्यांनी आमच्या ब्रँड्सवर दाखवलेल्या दीर्घकालीन विश्वासाचेही प्रतिबिंब आहेप्रत्येक हंगामात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारेविश्वासार्हमजबूत आणि उत्पादकता वाढविणारे ट्रॅक्टर्स उपलब्ध करून देत गेल्या अनेक दशकांत हा विश्वास निर्माण झाला आहेत्यामुळे तंत्रज्ञान अधिक सुलभ आणि सुसंगत, उपयुक्त बनवून जगभरातील शेतकऱ्यांचे जीवन बदलण्याच्या आमच्या ध्येयाला अधिक बळ मिळतेपुढील काळात आमची वाढ शेतकऱ्यांच्या बदलत्या गरजांनुसार आकार घेईलप्रगत उत्पादनेकुशल वैशिष्ट्ये आणि प्रत्यक्ष शेतात मूल्य निर्माण करणाऱ्या उपाययोजनांवर आमचे सातत्यपूर्ण लक्ष राहील.

50 हून अधिक बाजारपेठांमध्ये स्थान असलेली महिंद्रा FEB ही उत्पादनाच्या प्रमाणानुसार ट्रॅक्टर्स क्षेत्रातील जागतिक आघाडीची कंपनी आहेभारतानंतर अमेरिका ही तिची दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ असून तेथे तीन दशकांहून अधिक काळ कार्यरत आहेतिथे कंपनीची दोन असेंब्ली सुविधा केंद्रे आहेतअभियांत्रिकी कौशल्यडिजिटल एकत्रीकरण आणि शेतकऱ्यांविषयीच्या सखोल आकलनाचा लाभ घेतमहिंद्रा FEB आपल्या कृषी उपकरण ब्रँड्सच्या पोर्टफोलिओद्वारे जमीन तयार करण्यापासून ते कापणीनंतरच्या प्रक्रियेपर्यंत संपूर्ण मूल्यसाखळीत स्मार्ट अॅग्री मशिनरी उपायसुविधा विकसित करत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading