महाराष्ट्र विषयी आकसामुळेच् ‘कांदा निर्यात बंदी’ – गोपाळदादा तिवारी


पुणे दि १६ – पुणे जिल्हाधिकारी कार्याल
देशाचा “निर्यात दर” खालावत चालला असतांना, परकीय चलनाचा तुटवडा व आर्थिक मंदीची झळ” वाढत असतांना देखील निव्वळ ‘महाराष्ट्रा विषयी आकस भावना’ बाळगून व देशातील कांदा उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर असल्यामुळेच ‘देशांतर्गत कांदा निर्यात बंदीचा’ निर्णय केंद्रातील भाजप सरकार ने घेतला असल्याचे काॅंग्रेस चे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले. पुणे शहर जिल्हा काॅंग्रेस तर्फे केंद्र सरकारच्या ‘कांदा निर्यात बंदी’ निर्णया विरोधात जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली, या प्रसंगी गोपाळ तिवारी बोलत होते.
या प्रसंगी काॅंग्रेस चे शहराध्यक्ष रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार दिप्ती चवधरी, महापालिका गटनेते आबा बागूल यांची भाषणे झाली. अरविंद शिंदे, संजय बालगूडे, रजनी त्रिभूवन, अविनाश बागवे, विशाल मलके, रविंद्र धंगेकर, राजेंद्र शिरसाठ, संगिता तिवारी, मिरा शिंदे इ सह आजीमाजी नगरसेवक, पदाधिकारी, युवक काॅंग्रेस, कार्यकर्ते उपस्थित होते.. सुत्र संचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: