मी गरीब रुग्ण मला बेड मिळेल का? – रुग्णासह धर्मादाय आयुक्त कार्यालयावर आंदोलन
पुणे – धर्मादाय आयुक्त कार्यालय अंतर्गत पुणे शहरातील अनेक हॉस्पिटल येतात. या हॉस्पिटलमध्ये शासकीय नियमानुसार गरीब, निर्धन व व आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत उपचार करणे संबंधित हॉस्पिटल बंधनकारक आहे. परंतु काही हॉस्पिटल कोरोना चे कारण पुढे करून अशा गरीब व गरजू रुग्णांना ॲडमिट करून घेण्यास नकार देत आहेत. सोनाली सोनवणे यांना मेंदूच्या विकारा साठी गेले महिनाभर एका खासगी हॉस्पिटलमध्ये विनंती करून देखील दाखल करून घेण्यात आलेले नाही. सदर हॉस्पिटलवर नियमानुसार योग्य ती कारवाई करावी यासाठी धर्मादाय आयुक्त पुणे येथे भीम छावा संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.”मी गरीब रुग्ण, मला बेड मिळेल का? या आशयाचे फलक घेऊन रुग्णासहित हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व भीम छावा संघटनेचे अध्यक्ष शामभाऊ गायकवाड यांनी केले.यावेळी उपाध्यक्ष निलेश गायकवाड, नरेश माडणूर , विशाल कांबळे, मंगेश कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.