Tuesday, June 16, 2026
Latest NewsSports

पोर्तुगालमध्ये झालेल्या ‘एफआयएम मोटोज्युनिअर जागतिक अजिंक्यपद‌’ शर्यतीमध्ये भारतीय रेसिंगपटू सार्थक चव्हाण मोटार बाईकचे इंजीन फेलमुळे ‘रिटायर‌’ !!

पुणे :  पोर्तुगालमधील ‘अल्काबिदेचे-कास्केस‌’ येथे झालेल्या ‘एफआयएम मोटोज्युनिअर जागतिक अजिंक्यपद‌’ स्पर्धेच्या दुसरी शर्यतीमध्ये सहभागी झालेल्या भारतीय रेसिंगपटू आणि पुण्यातील सार्थक चव्हाण याची मोटार बाईकचे इंजीन फेल झाल्यामुळे शर्यतीमधून ‘रिटायर‌’ व्हावे लागले. ‘स्टॉक युरोपियन चॅम्पियनशीप‌’ या गटामध्ये ‘क्लिन्ट ज्युनिअर टिम दा कोर्सा‌’ या संघाकडून खेळणाऱ्या सार्थक याला सलग दुसऱ्यांदा अपयशाचा सामना करावा लागला.

नुकत्याच मे महिन्यामध्ये या स्पर्धेच्या झालेल्या पहिल्या शर्यतीमध्ये सार्थक याची याची मोटार बाईक ‘क्रॅश‌’ झाली आणि त्याला शर्यतीमधून बाहेर पडावे लागले होते. पोर्तुगालमध्ये झालेल्या या दुसऱ्या शर्यतीमध्येसुद्धा सार्थकला नशीबाने साथ दिली नाही आणि त्याला शर्यतीमधून रिटायर व्हावे लागले. स्पर्धेतील एकूण ३० रेसिंगपटूंमध्ये सार्थक हा एकमेव भारतीय रेसिंगपटू सहभागी झाला होता. सार्थकसह एकूण चार ड्रायव्हर शर्यतीमधून रिटायर झाले.

सार्थकने शर्यतीमध्ये दमदार सुरूवात केली होती. दुसऱ्या लॅपच्या अखेरीस सार्थक अकराव्या क्रमांकावर होता आणि पहिल्या दहा क्रमांकांमध्ये येण्याचे त्याचे प्रयत्न सुरू होते. तिसऱ्या लॅपनंतर मोटारबाईकमधील इंजीन फेल झाल्यामुळे त्याला शर्यत थांबवावी लागली. यावेळी बोलताना म्हणाला की, सलग दुसऱ्यांदा तांत्रिक कारणांमुळे मला शर्यतीमधून बाहेर पडावे लागले. हे निश्चितच निराशाजनक असून अशा वेळी संयम आणि स्वतःवरचा विश्वास ढळू न देणे, हे अधिक महत्वाचे आहे. शर्यतीमध्ये अशा गोष्टी होणे हे नेहमीच अध्यारूत असते. काही वेळा तुम्हाला अशा कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतो. अशा अपयशी वेळी तुम्ही खचून न जाता अधिक जोमाने आपल्या लक्ष्याकडे कूच केली पाहीजे. मी सुध्दा अशाच विचार करून पुढील शर्यतीसाठी सज्ज होणार आहे.

डीओसी पुणे, लेगसी मोटर्स, केवायटी हेल्मेट्स, एच.ओ.मी., रायनॉक्स आणि प्लनेट डीएसजी यांनी सार्थकला पाठींबा दिला असून सपोर्ट करत आहे. पुण्यातील उद्योजक कपिल शेळके यांनी पोर्तुगाल रेससाठी सार्थकला पाठींबा दिला आहे. तसेच सार्थक याला प्लॅनेट डीएसजीचे हरजीतसिंग मक्कर यांनी पाठींबा दिला असून सपोर्ट करत आहेत. सार्थक याने वयाच्या चौथ्या वर्षी बाईक चालवायला सुरूवात केली आणि वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत मोटोक्रॉस स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास सुरूवात केली. सार्थकला प्रशिक्षक अमोद तळपदे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading