Sunday, June 21, 2026
BusinessENTERTAINMENTLatest News

कल्याण ज्वेलर्स पूजा सावंतच्या ‘कप बशी’ चित्रपटाचे ऑफिशियल ज्वेलरी पार्टनर

पुणे : भारतातील सर्वात विश्वासू ज्वेलरी ब्रँड्सपैकी एक असलेल्या कल्याण ज्वेलर्सने आगामी मराठी चित्रपट ‘कप बशी’सोबत विशेष हातमिळवणी केली आहे. कल्याण ज्वेलर्स या चित्रपटाचे अधिकृत ज्वेलरी पार्टनर बनले आहेत. या सहयोगाच शुभारंभ चित्रपटातील मुख्य अभिनेत्री पूजा सावंत यांनी केली, त्यांनी कल्याण ज्वेलर्सच्या सातारा रोड शोरूमला भेट देऊन चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरचे अधिकृत अनावरण केले.

या कार्यक्रमात ग्राहक आणि चित्रपटप्रेमींनी खूप उत्साहाने भाग घेतला. प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंतची एक झलक पाहण्यासाठी आणि ज्या चित्रपटाची सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत आहेत, त्या मराठी चित्रपटाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी लोक एकत्र जमले होते. त्यांच्याशी संवाद साधताना पूजाने ‘कप बशी’ चित्रपटाशी संबंधित काही खास गोष्टी शेअर केल्या. त्यांनी कल्याण ज्वेलर्ससोबतच्या आपल्या गहिऱ्या नात्याबद्दल सांगितले आणि महाराष्ट्राची समृद्ध परंपरा व सांस्कृतिक वारसा साजरा करण्यात दागिन्यांचे महत्त्व किती मोठे आहे, याचा देखील आवर्जून उल्लेख केला.

या आनंदाच्या प्रसंगी पूजा सावंत म्हणाल्या, “कल्याण ज्वेलर्स अनेक वर्षांपासून माझ्या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग राहिला आहे आणि आमचे हे नाते आता अशा एका प्रोजेक्टपर्यंत पोहोचले आहे जे माझ्या मनाच्या खूप जवळ आहे, हे पाहून मला मनापासून आनंद होत आहे. ‘कप बशी’ हा एक अतिशय खास चित्रपट आहे आणि हा क्षण पुणेकरांसोबत शेअर करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. आज शोरूममध्ये मला जे प्रेम आणि आपुलकी मिळाली, त्याने हा प्रसंग आणखीनच खास बनला आहे.”

चित्रपटाच्या पोस्टरमध्ये पूजा सावंत एका नववधूच्या रूपात कल्याण ज्वेलर्सचे पारंपारिक महाराष्ट्रीयन दागिने परिधान करून  अतिशय सुंदर दिसत आहे. तिचा हा लूक ब्रँडच्या ‘संकल्प’ कलेक्शनमधील उत्कृष्ट आणि पारंपारिक डिझाईन्स दाखवतो; ज्यामध्ये ठुशी, मोहन माळ आणि मानाची नथ यांसारख्या सदाबहार दागिन्यांचा समावेश आहे. हा संपूर्ण लूक एका महाराष्ट्रीयन नववधूचे सौंदर्य आणि तिचा खानदानीपणा अचूकपणे सादर करतो.

ही भागीदारी पूजा सावंतसोबतच्या कल्याण ज्वेलर्सच्या जुन्या नात्याला सहजपणे पुढे नेते आणि संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांसोबत ब्रँडची पकड अधिक मजबूत करते. ‘कप बशी’ चित्रपटाशी जोडून घेत कल्याण ज्वेलर्सने महाराष्ट्रातील ग्राहकांच्या मनाच्या जवळ असणाऱ्या सांस्कृतिक क्षणांशी असलेले आपले नाते अधिक घनिष्ठ केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading