Sunday, October 18, 2026
Latest NewsPUNE

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तळजाई टेकडीवर वृक्षारोपण व स्वच्छता अभियान; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

पुणे  : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून श्रीमद राजचंद्र लव्ह अँड केअर, पुणे सेंटरच्या वतीने तळजाई टेकडी येथे वृक्षारोपण व स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका सौ. स्मिता वस्ते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली. अशा सामाजिक उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

या अभियानात श्रीमद राजचंद्र लव्ह अँड केअर, पुणे सेंटरचे सदस्य भरत मेहता, जिग्नेश फुरिया, भावेश शाह यांच्यासह अनेक सेवकांनी सक्रिय सहभाग घेतला. उपस्थितांनी मोठ्या उत्साहाने विविध प्रकारच्या रोपांचे वृक्षारोपण केले. तसेच तळजाई टेकडी परिसरातील रस्त्यांच्या कडेला स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला.

या उपक्रमातून पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व अधोरेखित झाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आणि सेवाकार्यातील प्रेरणेसाठी सहभागी सदस्यांनी पूज्य गुरुदेवश्री राकेशजी यांचे मार्गदर्शन, प्रेरणा व आशीर्वाद याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

पर्यावरण संवर्धनासाठी समाजातील सर्वांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading