देशातील कोरोना बळी चा आकडा 90 हजारांहून अधिक; २४ तासांत ८३,३४७ नवे कोरोना रुग्ण

नवी दिल्ली – भारतातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. देशभरातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येने ५६ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे चिंता आता प्रचंड वाढली आहे. मागील २४ तासांत देशात ८३ हजार ३४७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर १ हजार ८५ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला. यासह भारताची एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५६ लाख ४६ हजार ११ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा ९० हजार २० इतका झाला आहे. तसेच देशात आतापर्यंत ४५ लाख ८७ हजार ६१४ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या ९ लाख ६८ हजार ३७७ जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

दरम्यान, देशातील ७ राज्यांमध्ये कोरोनाची अधिक प्रकरणे समोर येत आहेत. यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब आणि दिल्लीचा समावेश आहे. त्यामुळे याठिकाणी कोरोनाचे नियम पाळणे आणि विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: