IPL 2020 – राजस्थान रॉयलची विजयी सुरुवात

दुबई – आयपीएल तेराव्या हंगामातील चौथा सामन्यात राजस्थान रॉयलच्या संघाने चेन्नई सुपर किंग्जला 16 धावांनी पराभूत केले आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने टॉस जिंकून राजस्थानच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानच्या संघाने कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि संजू सॅमसनच्या आक्रमक खेळीच्या जोरावर चेन्नईच्या संघासमोर 217 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, या लक्ष्याचा पाठलाग करत असताना चेन्नईच्या संघाला 16 धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: