भिम छावा कामगार संघटनेच्या वतीने चुल पेटवा आंदोलन


पुणे, दि. 23 – कोरोना व लॉकडाऊनमुळे अनेक संस्था, कंपनी, आस्थापना , घरकाम करणाऱ्या महिला, हॉटेल, शाळा, मॉल, या मध्ये कामकरणाऱ्या कामगारांना , कर्मचाऱ्यांना यांना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कामगारांना कामावरून निलंबित अथवा बडतर्फ करण्यात आले त्याचप्रमाणे त्यांना वेतनही कपात करण्यात आली त्यामुळे भिम छावा कामगार संघटनेच्या खालील मागण्यासाठी भिम छावा कामगार संघटनेचे अध्यक्ष शाम गायकवाड यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आंदोलन करण्यात आले
1) कोरोना व लॉकडाऊनमुळे कामावरून कमी केलेल्या कामगारांना कामावर घेण्यासाठी त्वरित आदेश द्यावे
2,) कोरोना व लॉकडाऊन मध्ये ते आजतागायत पर्यंत कामगारांना वेतन देण्यासाठी व वेतन कपात झाली पाहिजे
३) कोरोना विषयक कामगारांना विशेष पॅकेज जाहीर करा इ. मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी उपाध्यक्ष निलेशभाऊ गायकवाड, अमित मोरे, चंद्रकांत सोनकांबळे, निलम गायकवाड , यलप्‍पा गायकवाड मंगेश कांबळे इ. बहुसंख्य कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या

Leave a Reply

%d bloggers like this: