ऑनलाईन परीक्षा कालखंडात वीजपुरवठा सुरळीत ठेवा; मनविसे वडगावशेरीची महावितरणकडे मागणी

पुणे, दि. 23 – कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे यावर्षीच्या विद्यापीठाच्या पदवी व पदव्युतर पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाची आणि बँकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर ऑनलाईन परीक्षा कालखंडात  वीजपुरवठा सुरळीत ठेवा आशु मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना वडगावशेरीच्या वतीने महावितरणकडे करण्यात आली आहे.

कोरोनाच्या भीतीमुळे अनेक पालक आपल्या मुलांना परीक्षा देण्यासाठी ऑनलाईन परीक्षा देण्याचा पर्याय निवडणयास सुचवत आहेत त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना वडगावशेरी च्या वतीने कल्याणी नगर येथील महवितरण कार्यालय कार्यकारी अभियंता अशोक जाधव यांना निवेदन देण्यात आले.
ऑनलाईन परीक्षा कालखंडात महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा जेणेंकरून सर्व विद्यार्थी आपल्या ऑनलाईन परीक्षा विना विध्न व निधोक देतील व विद्यार्थ्यांचे वीज नसल्यामुळे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी महावितरण घेईल याची खात्री मनविसे ने व्यक्त केली. तसेच वीजपुरवठा वारंवारं खंडित होत असल्याने व पुन्हा वीजपुरवठा कधी सुरू होईल याची श्शवाती नसल्यामुळे किमान परीक्षा कालखंडात तरी महवितरण कडून वीजपुरवठा विनाखंडित राहील याची अपेक्षा करून याकडे मनविसे ने लक्ष देण्यास सांगितले. तश्या सूचना महवितरण ने आपल़्या विभागातील सर्व वीजकेंद्राना द्याव्यात ही विनंती केली, निवेदन देताना योगेश महिंद्रकर ( संघटक , चित्रपट सेना ), सागर खांदवे ( उपसंघटक , चित्रपट सेना), सतीश वानोळे ( सचिव, चित्रपट सेना ), कुलदीप घोडके ( विभागाध्यक्ष मनविसे) आदी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: