अभिनेता आयुष्यमान खुराणा टाइम मासिकाच्या यादीत

टाइम मासिकाने जगातील सर्वात १०० प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत बॉलीवुड अभिनेता आयुष्मान खुराणा याचा समावेश झाला आहे. या यादीत समावेश झालेले तो सर्वात तरुण अभिनेता आहे. कलाकारांच्या यादीत आयुष्मान खुरानासह मिचैला कोल, डैपर डैन, जैनिफर हडसन, यो यो मा आणि अली वॉन्ग या कलाकारांचा समावेश आहे.

याबाबत, आयुष्मानने इंस्टाग्रामवर पोस्टद्वारे माहिती दिली आहे. तसेच सर्व फॅन्सचे आभार मानले आहे. याचबरोबर आयुष्मानने टाइम मासिकाचे फोटो शेअर करत लिहिले आहे की,‘टाइम’ मासिकाच्या जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत माझ्या नावाचा समावेश झाला आहे. त्यामुळे मला माझा अभिमान वाटतो आहे. “

दरम्यान, आयुष्मान खुराणाने विकी डोनर या सिनेमातून डेब्यू केलं होतं. त्यानंतर त्याने ‘अंधाधूंद’ सिनेमातून सर्वांना खूश केलं. त्यासोबत शुभ मंगल सावधानमध्ये त्याने वेगळी भूमिका केली होती. नुकत्याच येऊन गेलेल्या शुभ मंगल ज्याादा सावधानमधून त्याने गे तरूणाची भूमिका साकारली. आणि बालामधून त्याने टक्कल पडलेल्या व्यक्तीची भूमिका साकारली. तसेच दम लगा है हैशा, बरेली की बर्फी, आर्टिकल १५ आणि ड्रिम गर्ल सिनेमातून त्याने दमदार परफॉर्मन्स करत प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली.

Leave a Reply

%d bloggers like this: