नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’ अडकला कायद्याच्या कचाट्यात

कॉपीराईटचे उल्लंघन केल्याप्रकरणी नागराज मंजुळे यांचा पहिला हिंदी चित्रपट ‘झुंड’च्या प्रदर्शनावर तेलंगणा उच्च न्यायालयाने आज स्थगिती आणली. तसेच देश-विदेश किंवा कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकणार नाही, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला.

फुटबॉलपटू अखिलेश पॉल यांच्या जीवनावर चित्रपट बनवण्याचे हक्क नंदी कुमार यांनी विकत घेतले होते. झुंडमधून विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात ही कथा दाखवण्यात आल्याने कॉपीराईट हक्काचा भंग झाल्याची तक्रार नंदी कुमार यांनी दाखल केली होती. यावरून या चित्रपटावर तेलंगणा उच्च न्यायालयाने स्थगिती आणली. ‘झुंड’च्या निर्मात्यांनी माझी फसवणूक केली. माझ्यावर दबाव आणला, असा आरोपही नंदी कुमार यांनी केला होता. दरम्यान, ‘झुंड’ चित्रपटात अमिताभ बच्चन झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉल शिकवणाऱ्या सेवानिवृत्त क्रीडा शिक्षकाची भूमिका साकारली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: