विशाल पोरे यांचे निधन  


पुणे : नामदेव समाजोन्नती परिषद, पुणे शहरचे उपाध्यक्ष, येरवडा नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष विशाल आप्पासाहेब पोरे यांचे पुणे येथे नुकतेच निधन झाले.
विशाल पोरे यांनी अनेक वर्षे समाजकार्य केले आहे. येरवडा परिसर टिंगरेनगर येथील शिवसेना शाखेचे ते प्रमुख होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगी, बहिण, भाऊ व पुतण्या असा परिवार आहे. 
लॉकडाऊनच्या काळात नामदेव समाजोन्नती परिषद पुणे शहरच्या माध्यमातून रक्तदान शिबीर,आरोग्य तपासणी शिबीर तसेच अनेक गोर गरीब व वंचित, देवदासी, पोतराज, वासुदेव व गोंधळी कुटुंबियांना धान्य कीट वाटप करणे अशा अनेक समाजकार्यात सहकार्य केले. त्यांच्या या कार्याची राष्ट्रीय पातळीवरील सामाजिक संस्थांनी दखल घेवून त्यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित केले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: