गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

मुंबई, दि. 16 – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या इनकमिंगचे प्रमाण वाढत आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड चे माजी आमदार आणि अभ्युदय बँकेचे अध्यक्ष सिताराम घनदाट यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बुधवारी जाहीर प्रवेश केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, आमदार बाबाजानी दुर्राणी, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, चिटणीस संजय बोरगे , युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण माजी आमदार विजय भांबळे आदी उपस्थित होते.

गंगाखेड मतदारसंघाचे माजी आमदार सीताराम घनदाट यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य परभणी व अभ्युदय बँकेचे संचालक भरत घनदाट, माधव ठवरे, लालया पठाण, अमित घनदाट, गणेश काळे, गौतम हत्तीअंबिरे, मधुसूदन लापटे, चेअरमन जाधव, विनायक राठोड, दत्ताराव भोसले, दयानंद कदम, तुळशीराम शिंदे, विठ्ठल टोपे, डी. के. पाटील, विजयकुमार शिंदे, रावसाहेब शिंदे, शेखभाई चाऊस, शेख मुस्ताफा यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Leave a Reply

%d bloggers like this: