Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTTOP NEWS

न्यायालयाने रिया चक्रवर्तीसह ६ जणांचा जामीन अर्ज फेटाळला

मुंबई, दि. 11 – अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात अमली पदार्थविरोधी विभागाने (एनसीबी) अटक केलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोवीक, सुशांतचा घर व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, घर मदतनीस दीपेश सावंत यांच्यासह ड्रग्ज डिलर अब्दुल बशीत आणि झैद विलात्रा यांचा जामीन अर्ज आज न्यायालयाने फेटाळला.

सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात जेव्हा ड्रग्ज अँगल समोर आला, त्यावेळेस ‘एनसीबी’ने तपास आपल्या हाती घेत गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान रियाला अटक करण्यात आली. तिच्यावर ड्रग्ज घेणे, सुशांतला ड्रग्ज देणे आणि ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात असल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. रियासह शोवीक, सॅम्युअल, दीपेश आणि सहा ड्रग्ज डिलर्सना अटक केली आहे. रियासह अन्य आरोपी आता न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. रियाच्या जामिनाची याचिका याआधीच ‘एनसीबी’ न्यायालयाने रद्दबातल ठरवली आहे. त्यामुळे रियासह अन्य आरोपींनी जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.

बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतला. त्यानंतर जामिनावरील सुनावणी एक दिवस पुढे ढकलली. त्यानंतर आज शुक्रवारी दुपारी बारा वाजता यावर सुनावणी झाली. आता रियाला आणखी काही काळ भायखळा कारागृहातच काढावी लागणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading