Monday, June 15, 2026
PUNE

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळणे दुर्दैवी- संभाजी ब्रिगेड

पुणे, दि. ९ – संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ गेली अनेक वर्ष मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश ही मागणी करत आलेली आहे. मागील काही काळामध्ये घटनेच्या १५/३ व १६/४ कलमा अंतर्गत मराठा समाजाला शिक्षण व नोकरी यामध्ये सवलती जाहीर करण्यात आल्या होत्या. त्या सवलतीचा लाभ घेत राहणे व मराठा समाजाचा ओबीसी समावेशासाठी लढत राहणे या प्रकारची भूमिका संभाजी ब्रिगेड ने घेतलेली होती.. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर घटना पिठाची मागणी करण्यात आली होती त्यावेळीही संभाजी ब्रिगेड ने हा धोका होण्याची शक्यता व्यक्त केली होती. आरक्षण लढ्यात सहभागी झालेल्या समाज बांधव व संघटनांना यानिमित्ताने पुनश्च एकदा विनंती करण्यात येत आहे की आपण नैराश्यात न जाता माननीय गायकवाड आयोगाचा अहवालाचा आधार घेत महाराष्ट्र सरकारवर दबाव निर्माण करून ओबीसी समावेशासाठी आग्रह धरणे हे योग्य राहील… आजचा निर्णय सगळ्या निष्क्रिय नेत्यांचे राजकीय पाप आहे.

घटनात्मक पध्दतीने मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश केला तरच आरक्षण टिकु शकते. असे मत संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर आणि पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading