Verified Calls गुगलचे नवीन फिचर
गुगलने आपल्या फोन अॅपमध्ये एक नवीन फीचर सामील केले आहे. याचे नाव Verified Calls ठेवण्यात आले आहे. याच्या मदतीने अनोळखी नंबरहून आपल्याला कोण कॉल करत आहे, हे ओळखता येणार आहे. गुगलचे हे नवीन फीचर TrueCaller ला टक्कर देऊ शकते. आजकाल अनेक कंपन्या कॉलद्वारे सेवा प्रदान करतात. ग्राहक सेवाचा देखील यात समावेश आहे. अशातच अनेकवेळा फसवणूक करणारे कॉल देखील येतात. मात्र अशा कॉल पासून वाचण्यासाठी हे फीचर आपल्याला मदत करणार आहे.
Verified Calls वापरकर्त्याला एखाद्या कंपनीतून आलेला कॉल योग्य कंपनीतून आलेला आहे की नाही? किंवा कोणी आपली फसवणूक करण्यासाठी तर कॉल केलेला नाही ना. याची योग्य माहिती देण्यास मदत करणार आहे. गुगलचे हे फीचर फीचर हिंदुस्थान, स्पेन, ब्राझील, मेक्सिको आणि अमेरिकेसह जगभरात लॉन्च केले जात आहे. Google Verified हे कोणतेही अॅप नसून हे एक फीचर आहे. जे अँड्रॉइडच्या प्रत्येक डिव्हाइसमध्ये इनबिल्ड केले जाणार आहे. काही दिवसातच अँड्रॉइड अपडेटच्या साहाय्याने प्रत्येक वापरकर्त्याला हे उपलब्ध होणार आहे. गुगल Verified Calls हे TrueCaller अॅपचे काम करेल.
