कोरोना – राज्यात बुधवारी 23 हजाराहून अधिक नवीन पॉझिटिव्ह रुग्ण; 325 जणांचा मृत्यू
पुण्यात दिवसभरात 2078 पॉझिटिव्ह
मुंबई – राज्यात कोरोना बाधितांचा आलेख वाढतच जात आहे. आज 23 हजार 816 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. या नव्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे.
गेल्या 24 तासांत 13 हजार 906 रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. तर आज 325 मृतांची नोंद झाली आहे. आजच्या नव्या रुग्णसंख्येमुळे एकूण बाधितांचा आकडा9 लाख 67 हजार 349 वर पोहोचला आहे. यामध्ये 6 लाख 86 हजार 462 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 2 लाख 52 हजार 734 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
पुणे ९ सप्टेंबर
…….
– दिवसभरात २०७८ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात २०१३ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात ६४ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. २३ रूग्ण पुण्याबाहेरील.
– ९२७ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ४८३ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या १११९१६.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १६६७७.
– एकूण मृत्यू -२६२५.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- ९२६१४.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७६०९.
