fbpx
Friday, April 19, 2024
MAHARASHTRATOP NEWS

कोरोना -राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 19 हजारांहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण; 312 जणांचा मृत्यू

मुंबई, दि.५: राज्यात आतापर्यंत एकूण ६ लाख ३६ हजार ५७४ रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.१ टक्के आहे. आज १० हजार ८०१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून १९ हजार २१८ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत सध्या २ लाख २०  हजार ६६१ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले २०,४८९ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३१२ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१७३७ (३३), ठाणे- २८६ (९), ठाणे मनपा-३३५ (२), नवी  मुंबई मनपा-४१३ (४), कल्याण डोंबिवली मनपा-४३५ (१), उल्हासनगर मनपा-३३, भिवंडी निजामपूर मनपा-५ (२), मीरा भाईंदर मनपा-२६२ (४), पालघर-२४२ (२), वसई-विरार मनपा-२०३ (२), रायगड-६४९ (५), पनवेल मनपा-२६३ (४), नाशिक-२५७ (१०), नाशिक मनपा-५६६ (५), मालेगाव मनपा-५४ (१), अहमदनगर-५०८ (८),अहमदनगर मनपा-२७९ (७), धुळे-१३१ (४), धुळे मनपा-५४ (१), जळगाव- ४३६ (६), जळगाव मनपा-६८ (१), नंदूरबार-१०८ (१), पुणे- १३४५ (५), पुणे मनपा-२३६६ (३२), पिंपरी चिंचवड मनपा-९५३ (७), सोलापूर-६१९ (७), सोलापूर मनपा-८४ (१), सातारा-९३९ (१३), कोल्हापूर-४८४ (१५), कोल्हापूर मनपा-२३० (३), सांगली-४६२ (५), सांगली  मिरज कुपवाड मनपा-४२६ (६), सिंधुदूर्ग-९५, रत्नागिरी-१९१ (२), औरंगाबाद-१६७,औरंगाबाद मनपा-२३१ (९), जालना-१३४ (३), हिंगोली-६९, परभणी-७२ (२), परभणी मनपा-४४ (१), लातूर-२४० (६), लातूर मनपा-१९१ (१), उस्मानाबाद-२४० (६), बीड-२०६ (४), नांदेड-१९६ (७), नांदेड मनपा-१५८ (८), अकोला-७६ (२), अकोला मनपा-४५(१), अमरावती- १९, अमरावती मनपा-६५, यवतमाळ-१४० (७), बुलढाणा-६९ (२), वाशिम-७८, नागपूर-३८८ (४), नागपूर मनपा-१३४२ (२७), वर्धा-१०९ (४), भंडारा-१८५ (४), गोंदिया-१४५, चंद्रपूर-१८६ (३), चंद्रपूर मनपा-१३७ (१), गडचिरोली-१४, इतर राज्य- २५ (२).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४५ लाख ५६ हजार ७०७ नमुन्यांपैकी ८ लाख ८३ हजार ८६२ नमुने पॉझिटिव्ह (१९.३ टक्के) आले आहेत. राज्यात १४ लाख ८१ हजार ९०९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार १९६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३१२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.९७ टक्के एवढा आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading