Thursday, June 18, 2026
PUNE

डॉ. मिलिंद संपगावकर यांची भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य व सेवा उद्योग प्रमुखपदी निवड

पुणे, दि. 5 – भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीची प्रदेश कार्यकारिणी सदस्यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे. प्रदेश संयोजक प्रदीप पेशकार आणि प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्योग आघाडी प्रदेश कार्यकारिणी सदस्यांची घोषणा केली आहे. डॉ. मिलिंद संपगावकर यांची यामध्ये सदस्य व सेवा उद्योग प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.

डॉ. मिलिंद संपगावकर म्हणाले कि, मागील अनेक वर्षापासून समाजकार्य करीत असताना भारतीय जनता पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्ष्याने माझ्या क्षेत्रात काम करण्यासाठी जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी व पक्षनेतृत्वाने ठेवलेला विश्वास सार्थ करण्यास मी कटिबद्ध असेल. अनेक बुद्धीवंतांचा व कर्तृत्व असणाऱ्यांचा पक्ष अशी भारतीय जनता पक्षाची ख्याती असून सर्वसामान्य कार्यकर्त्याचा पक्ष नेहमीच संघटना व संघटनात्मक बांधणीसाठी त्याचा उपयोग करीत असतो याचे एक ज्वलंत उदाहरण हे माझ्या नेमणूक दिसून येते. माझी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उद्योग आघाडी कार्यकारणी सदस्य पदी तसेच सेवा उद्योग प्रमुख महाराष्ट्र राज्य पदी नेमणूक केल्याबद्दल मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी प्रदेश संयोजक प्रदीपजी पेशकार, व प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे, खासदार गिरीश बापट, भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश महासचिव आमदार प्रा. देवयानी सुहास फरांदे, भारतीय जनता पार्टी प्रदेश महासचिव श्रीकांत भारती, आमदार मुक्ता टिळक व सर्व हितचिंतकांचे आभार व कायम ऋणी राहणार असल्याचे डॉ. संपगावकर म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading