शोभा रासने यांचे निधन


पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टमधील महिला विभाग प्रमुखांपैकी एक असलेल्या शोभाताई तुकाराम रासने यांचे दु:खद निधन झाले. त्या ५४ वर्षांच्या होत्या. पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने व दगडूशेठ गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने यांचे चुलत बंधू तुकाराम रासने यांच्या त्या पत्नी होत. 
बुधवार पेठेतील रहिवासी असलेल्या शोभा रासने यांच्या मागे पती, मुलगा, सून, मुलगी, जावई असा परिवार आहे. कोरोनामुळे त्यांचे निधन झाले असून त्यांच्यावर एरंडवण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे आयोजित गणेशोत्सवात बाप्पांच्या गणेशयाग व अभिषेक पात्रांची नित्य स्वच्छता, बाप्पाची रोज २१ निरंजनांनी अत्यंत भक्तिप्रेमाने आरती करणे आणि संकष्टी चतुर्थीला बाप्पाना आवडीने महानैवेद्य अर्पण करणे या सर्व सेवा त्या अखंडपणे करीत होत्या. शोभाताई स्वानंदवासी झाल्या असून बाप्पांच्या चरणी लीन झाल्या आहेत. श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Leave a Reply

%d bloggers like this: