माजी केंद्रीय मंत्री जसवंतसिंग यांचं निधन

नवी दिल्ली – राजस्थानमध्ये भाजपला बळकटी देणारे माजी केंद्रीय मंत्री जसवंतसिंह यांचे आज निधन झाले. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. याचबरोबर पंतप्रधान मोदी यांनी देखील जसवंतसिंह यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
संरक्षणमंत्री राजनाथसिंह म्हणाले की, जसवंतसिंह हे त्यांच्या बौद्धिक क्षमतांसाठी आणि देशाच्या सेवेसाठी कायम स्मरणात राहतील. त्यांनी राजस्थानमध्ये भाजपाला बळकट करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. या दुःखाच्या प्रसंगी मी त्यांच्या परिवार व समर्थकांच्या बरोबर आहे.

जसवंतसिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत मोदींनी ट्वटिमध्ये म्हटले की, जसवंतसिंह यांनी संपूर्ण मन लावून देशाची सेवा केली. अगोदर एका सैनिकाच्या रुपात आणि नंतर राजकारणातील आपल्या प्रदीर्घ कार्यकाळाद्वारे. अटलजींच्या सरकारच्या कार्यकाळात त्यांनी महत्वपूर्ण विभागांचे काम पाहिले आणि अर्थ, रक्षा व परराष्ट्र मुद्यांची जगभरात एक मजबूत छाप सोडली. त्यांच्या निधनाने दुःखी आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: