IPL2020 – कोलकाता नाईटरायडर्सचा हैद्राबादवर विजय

दुबई :  कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद ( KKR v SRH ) यांच्यात रंगलेल्या आजच्या सामन्यात कोलकाता संघाचा शानदार विजय झाला. शुबमन गिलच्या फटकेबाजीच्या कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामात पहिल्या विजयाची नोंद केली आहे. कोलकाता नाईटरायडर्सने हैद्राबादवर ७ गडी राखून मात केली. 

सनरायझर्स हैदराबादनं प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १४२ धावा केल्या. तर कोलकाता नाईट रायडर्सनं अवघ्या १८ ओवरमध्येच ३ बाद १४५ धावा करून हैदराबादवर मात केली. ७० रन्स काढणारा शुभमन गिल कोलकात्याच्या विजयाचा शिल्पकार ठरला. सनरायझर्स हैदराबादतर्फे मनिष पांडेंनं अर्धशतक ठोकलं शुभमन गिलच्या कामगिरीला मॉर्गनने दिलेली उत्तम साथ दिली. मॉर्गनने नाबाद ४२ धावा काढत गिलला चांगली साथ दिली

Leave a Reply

%d bloggers like this: