भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने ब्लिट्झ प्रीमियर लीगसाठी केला ब्लिट्झपोकरशी करार

भारतात सध्या चाललेला क्रिकेट कार्निवल साजरा करण्यासाठी डॅन बिल्झेरियनची अधिकृत पोकर रूम ब्लिट्झपोकरने ब्लिट्झ प्रीमियर लीग Blitz Premier League (बीपीएल) लाँच करण्यासाठी प्रख्यात भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकशी करार केला आहे. भारतीय क्रिकेट संघातील यष्टीरक्षक-फलंदाज आणि सध्या चाललेल्या आयपीएल २०२० मध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा (केकेआर) कर्णधार असलेला दिनेश कार्तिक हा आता ब्लिट्झ प्रीमियर लीगचा चेहरा आहे. दिनेश कार्तिकने २००४ मध्ये भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केले आणि २००७ मध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत त्याने संघासाठी सर्वाधिक धावा करून, भारताला २१ वर्षानंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका विजय मिळवून देण्यात मदत केली. 

पोकरबद्दलच्या प्रेमाची सांगड क्रिकेटशी घालून भारतीय चाहत्यांना अजोड रोमांचक अनुभव देणे हे उद्दिष्ट असलेली ब्लिट्झ प्रीमियर लीग म्हणजे २१ सप्टेंबर २०२० पासून सुरू झालेली एक ऑनलाइन पोकर स्पर्धा आहे. या ४५ दिवस चालणा-या स्पर्धेमध्ये अनेक रोमांचक वळणे येतील आणि नवीन व पूर्वीपासूनच्या ब्लिट्झपोकर खेळाडूंना ५० लाख रुपये मूल्याची बक्षिसे दिली जातील. भारतभरातील नवीन खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी ब्लिट्झपोकरतर्फे BLITZPOKER ब्लिट्झ प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे. रोचक बाब म्हणजे, ऑनलाइन गेमिंग केवळ महानगरांतील प्रकार आहे या लोकप्रिय समजाला छेद देत, श्रेणी-२ शहरांतूनही ऑनलाइन गेमिंगला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. शहरी व ग्रामीण अशा दोन्ही लोकसंख्यांमध्ये कमी किंमतीच्या स्मार्टफोन्सची वाढती संख्या हा या वाढीचा प्रमुख चालक घटक आहे.

ब्लिट्झ प्रीमियर लीग अर्थात बीपीएल BPL दररोज ७५,००० रुपये बक्षिसाच्या बीपीएल स्ट्रायकर स्पर्धा घेणार आहे. खेळाडू केवळ ११० रुपयांची प्रवेशिका (गुंतवणूक) घेऊन या स्पर्धेत भाग घेऊ शकतात.

दिनेश कार्तिकशी झालेल्या भागीदारीबद्दल, इंटरनेट रॉयल्टीबद्दल डॅन बिल्झेरियन म्हणाले, “या स्पर्धेसाठी दिनेश कार्तिकच्या क्षमतेचा क्रिकेटपटू आमच्यासोबत असणे हा खरोखर थरारक अनुभव आहे. मी त्याचे आमच्या परिवारात स्वागत करतो आणि या सहयोगाने आमचा उत्साह खूप वाढवला आहे. तो केकेआरचा कर्णधार असल्याने आगामी सामन्यांसाठी मी त्याला शुभेच्छा देतो. पोकर या खेळात प्रावीण्य मिळवण्यासाठी जे कष्ट आणि समर्पण आवश्यक असते, त्याचे कार्तिक प्रतीक आहे.” बिल्झेरियन स्पर्धेबद्दल पुढे म्हणाले, “भारतीयांचे क्रिकेटवर असलेले प्रेम आणि त्याचबरोबर अत्यंत कौशल्याचा खेळ पोकर हे दोन्ही साजरे करण्याचा ब्लिट्झ प्रीमियर लीग हा एक मार्ग आहे. भारतातील पोकर समुदाय या खेळाप्रती असलेले प्रेमही दाखवून देईल असे आम्हाला अपेक्षित आहे आणि ते बघण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.” 

ब्लिट्झ प्रीमियर लीगशी झालेल्या सहयोगाबद्दल दिनेश कार्तिक म्हणाला, “क्रिकेटप्रमाणेच पोकरसाठीही विशिष्ट कौशल्यांचा संच आवश्यक असतो. ही कौशल्ये संपादित करण्यासाठी समर्पण, कष्ट आणि सरावाची आवश्यकता असते. ब्लिट्झ प्रीमियर लीग ही एक अनोखी ऑनलाइन पोकर स्पर्धा आहे आणि पोकर चाहत्यांसाठी हा नक्कीच रोमांचक अनुभव ठरेल. ब्लिट्झपोकरशी भागीदारी हा माझा या खेळाला पाठिंबा देण्याचा आणि खेळाडूंप्रती आदर व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे.”

ब्लिट्झ प्रीमियर लीग दररोज भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८:३० वाजता ब्लिट्झपोकर प्लॅटफॉर्मवर होणार आहे. ब्लिट्झ प्रीमियर लीगच्या नियम व अटींबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया  https://www.blitzpoker.com/ या वेबसाइटला भेट द्या आणि @blitzpokerofficial ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा.

Leave a Reply

%d bloggers like this: