भारताची नवीन ‘कॅडबरी डेअरी मिल्‍क – हिंट ओ’मिंट व पांजीर’

कॅडबरी अन्वेषकांमधील गोड संघर्ष अखेर संपला आहे. माँडेलीझ इंडिया या कॅडबरी डेअरी मिल्‍क, ५ स्‍टार, ओरिओ, बॉर्नविटा इत्‍यादी भारताच्‍या काही आवडत्‍या स्‍नॅकिंग ब्रॅण्‍ड्सच्या उत्‍पादक व बेकर्स कंपनीने आज ‘गो मॅडबरी फॉर कॅडबरी’ कॅम्‍पेनच्‍या विजेत्‍या स्‍वादांची घोषणा केली. कंपनी कॅडबरी प्रेमी अपूर्वा राजन (बेंगळुरू) आणि प्रभजोत आनंद (पंजाब) यांनी तयार केलेले अनुक्रमे कॅडबरी बॉर्नवली स्‍वाद व मिंट क्रिस्‍टल्‍सने युक्‍त कॅडबरी डेअरी मिल्‍क हिंट ओ’मिंट आणि पान स्‍वाद व अंजीरने युक्‍त कॅडबरी डेअरी मिल्‍क पांजीर सादर करत आहे. ८०० हजारांहून अधिक प्रवेशिकासह मॅडबरीच्‍या पहिल्‍याच पर्वाला मिळालेल्‍या भव्‍य यशानंतर कंपनी मॅडबरी २.० सादर करण्‍यास सज्‍ज आहे, ज्‍यामधून कंपनी ग्राहकांना विचारत आहे की ‘कहाँ से आयेगी हमारी अगली कॅडबरी?’.

माँडेलीझ इंडियाच्‍या मार्केटिंग (चॉकलेट्स), इनसाइट्स व अॅनालिटिक्‍सचे वरिष्‍ठ संचालक अनिल विश्‍वनाथन म्‍हणाले, ”कॅडबरी डेअरी मिल्‍कचा स्‍वाद देशाच्‍या विविध स्‍नॅकिंग गरजांची पूर्तता करण्‍यासाठी अद्वितीय व्‍हर्जन्‍समध्‍ये बदलण्‍यात आला आहे. ज्‍यामधून घरातील घटक म्‍हणून आमच्‍या ग्राहकांच्‍या जीवनातील त्‍याचे अद्वितीय स्‍थान दिसून येते. म्‍हणूनच आम्‍ही सर्व चॉकलेटप्रेमींना स्‍वाद व त्‍यांच्‍या आवडीच्‍या साहित्‍यांसह प्रयोग करत त्‍यांची ‘होमवाला’ कॅडबरी तयार करण्‍याची संधी देण्‍यासाठी मॅडबरी सादर केली. ज्‍यामुळे आमचे ग्राहकांसोबतचे संबंध अधिक दृढ झाले आहेत. लोकांचा त्‍यांच्‍या आवडीच्‍या चॉकलेट बारच्‍या स्‍वादामध्‍ये अद्वितीय फ्लेवर्स असण्‍याचा अद्वितीय विचार व सर्जनशील संयोजने, तसेच भारतीयांची देशी/स्‍थानिक स्‍वादांप्रती असलेली आवड पाहून आनंद झाला. पहिल्‍या पर्वाला मिळालेला अविश्‍वसनीय प्रतिसाद पाहून आम्‍हाला आता मॅडबरी २.० सादर करण्‍याचा आनंद होत आहे. आम्‍ही आशा करतो की, याला देखील देशभरातून भरघोस प्रतिसाद मिळेल.

एक कंपनी म्‍हणून माँडेलीझ इंडिया नाविन्‍यता आणण्‍याचा आणि ग्राहकांना आनंदित करण्‍याचा नेहमीच नवीन मार्ग शोधत आली आहे. मॅडबरी ‘लोकांची, लोकांद्वारे व लोकांसाठी’ निर्माण केलेल्‍या सर्वसमावेशक कॅम्‍पेनच्‍या माध्‍यमातून आमचे संबंध अधिक दृढ करण्‍याचा आाणखी एक प्रयत्‍न आहे. आम्‍ही कॅडबरीच्‍या विश्‍वामध्‍ये सादर करण्‍यात येणा-या इतर उत्‍साहवर्धक स्‍वादांना पाहण्‍यास खूपच उत्सुक आहोत.”

मॅडबरीच्‍या पहिल्‍या पर्वाला व्‍यासपीठांवर ८२३ दशलक्षहून अधिक इम्‍प्रेशन्‍स, २०५ दशलक्ष व्‍ह्यूज आणि १.७ कोटी ग्राहकांचा सहभाग दिसण्‍यात आला. ज्‍यामधून स्‍थानिक स्‍वादांप्रती प्रेम दिसून येण्‍यासोबत इतर घटकांपासून बनवलेले कॅडबरी व्‍हर्जन्‍स समोर आले जसे चाय व ईलायची, पान व मिक्‍स बेरीज, कुल्‍फी व बदाम, कॅश्‍यू व मिश्‍तीदोई इत्‍यादी. हा ग्राहक-केंद्रित उपक्रम आहे – ग्राहकांनी ग्राहकांसाठी बनवलेले स्‍पेशल चॉकलेट बार्स. ग्राहकांनी अव्‍वल २ विजेत्‍या स्‍वादांना मते दिली. या ग्राहक-केंद्रित सादरीकरणाला पाठिंबा देत ब्रॅण्‍ड विजेते व व विजेत्‍या स्‍वादांसाठी काही स्‍पेशल डिजिटल सहभाग निर्माण करण्‍यासाठी भारतीय सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूरसोबत सहयोग जोडणार आहे. हे मर्यादित आवृत्तीमधील बार्स – कॅडबरी डेअरी मिल्‍क हिंट ओ’मिंट आणि कॅडबरी डेअरी मिल्‍क पांजीर ऑक्‍टोबर २०२०च्‍या पहिल्‍या आठवड्यामध्‍ये बाजारपेठेत सादर होत ग्राहकांना आनंद देण्‍यास सज्‍ज आहेत. 

ग्राहकांनी त्‍यांची पाककला सर्जनशीलता दाखवण्‍यासाठी उत्‍साह व जोमात घेतलेल्‍या सहभागाला पूरक म्‍हणून माँडेलीझ इंडिया आता कॅम्‍पेन मॅडबरी २.० चे दुसरे पर्व सादर करण्‍यास सज्‍ज आहे, ज्‍याअंतर्गत कंपनी ग्राहकांना विचारते की, ‘कहाँ से आयेगी हमारी अगली कॅडबरी’. यंदा ब्रॅण्‍ड देशाच्‍या विविध भागांमध्‍ये स्‍पर्धेची भावना जागृत करत या कॅम्‍पेनला नव्‍या उंचीवर घेऊन जाणार आहे. ते पूर्वीच्‍या पर्वामध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या मिल्‍क चॉकलेट माससोबत व्‍हाइट चॉकलेट मास देखील सादर करणार आहेत. ज्‍यामुळे ग्राहकांना उत्‍साहवर्धक नवीन संयोजनांसह प्रयोग करण्‍याची पूर्णत: नवीन संधी मिळणार आहे. मॅडबरी २.० मध्‍ये ३ विजेत्‍यांची निवड करण्‍यात येईल आणि ही कॅम्‍पेन २८ सप्‍टेंबर २०२० ते ३० ऑक्‍टोबर २०२० पर्यंत सुरू राहिल.

Leave a Reply

%d bloggers like this: