कर्तव्य फाउंडेशनतर्फे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सी.ई.ओ.अमित कुमार यांना कोरोना योध्दा सन्मान

पुणे, दि. 22 – कर्तव्य फाउंडेशनतर्फे पुणे कँन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार यांना कोरोना योध्दा सन्मान देऊन गौरविण्यात आले.

फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अशोक देशमुख व अध्यक्ष विकास भांबुरे यांच्या हस्ते अमित कुमार यांना सन्मानचिन्ह व शाल देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी नगरसेवक दिलीप गिरमकर,विनोद मथुरावाला, प्रियंका श्रीगिरी, मोहसीन शेख,विजय भोसले आदी उपस्थित होते.
गेली पाच महिने कोरोना संसर्ग काळात अमित कुमार यांनी अविरतपणे आपले कर्तव्य बजावले आहे. त्यांनी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड भागात लाॅकडाऊन यशस्वी करण्यासाठी व कोरोना रूग्णांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. स.व.पटेल रूग्णालयात सुसज्ज आय.सी.यु.कक्ष उभारण्यासाठी व अद्ययावत उपकरण बसविण्यासाठी राज्य शासनाचा व लोकप्रतिनिधींचा निधी मिळवण्यासाठी अमित कुमार यांनी विशेष पाठपुरावा केला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला असल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे यांनी यावेळी सांगितले व त्यांना पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: