भारती विद्यापीठ ‘आयएमईडी’ मध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणावर ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रॉग्रॅम’

पुणे : भारती अभिमत विद्यापीठाच्या ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ( ‘आयएम ई डी)’ मध्ये
राष्ट्रीय शिक्षण धोरण तसेच अध्ययन ,अध्यापन ,मूल्यांकन या विषयावर ६ दिवसीय ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रॉग्रॅम ‘ आयोजित करण्यात आला होता. डॉ अमोल चरेगावकर,डॉ प्रवीण रेवणकर,डॉ अर्चना ठोसर ,डॉ निखिल मेहता यांनी मार्गदर्शन केले.
‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ‘आयएमईडी’ चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी स्वागत केले. ‘आयएमईडी’ च्या पौड रस्ता येथील कॅम्पस मध्ये हा प्रशिक्षण कार्यक्रम १४ ते १९ सप्टेंबर दरम्यान ऑन लाईन पार पडला . ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रॉग्रॅम ‘यशस्वी होण्यासाठी संयोजन समितीमधील डॉ सचिन आयरेकर,डॉ प्रमोद पवार,डॉ सोनाली खुरजेकर,डॉ बलजीत कौर,डॉ स्वाती देसाई यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

%d bloggers like this: