मोदीजींच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी प्रयत्नशील – जगदीश मुळीक 


पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लक्ष अंत्योदय ठेऊन समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.त्यांच्या स्वप्नातील भारत आपल्याला घडवायचा आहे त्यासाठी आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे. याच भावनेतून सुनील माने यांच्या तर्फे रिक्षा चालकांसाठी आयोजित केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. असे मत भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शहर भाजपच्या वतीने सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमाअंतर्गत भाजप शहर चिटणीस सुनील माने यांच्या वतीने आज औंध, बोपोडी येथील आठ रिक्षा स्टॅण्डला भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते मोफत सॅनिटायझर आणि इन्फ्रारेड थर्मामिटरचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. बोपोडीमधील आंबेडकर चौक येथे झालेल्या या कार्यक्रमाला नगरसेवक विजय शेवाळे, प्रकाश ढोरे,धनराज घोगरे, मधुकर मुसळे, शिवाजीनगर मतदार संघाचे सरचिटणीस आनंद छाजेड आदी उपस्थित होते. 
यावेळी बोलताना मुळीक म्हणाले, मोदीजींनी देशातील गोरगरीब जनतेच्या हितासाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या आहेत. देशाची प्रगती साधत असताना समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेतले पाहिजे याबाबत मोदीजी आग्रही असतात. मोदीजींचे हेच विचार सर्वसामन्यांपर्यंत पोहचवण्यासाठी आपण सेवा सप्ताह साजरा करतो. या कार्यक्रमा अंतर्गत सुनील माने यांनी रिक्षा चालकांना मोफत सॅनिटायझर आणि इन्फ्रा थर्मामीटर वाटप केले. आज पुण्यामध्ये ‘कोरोना’ संक्रमण वेगाने पसरत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य जनतेच्या सुविधेसाठी रिक्षाचालक रस्त्यावर आहे. रिक्षातून मिळणारे तुटपुंजे उत्पन्न पाहता त्यांना सॅनिटायझर किंवा इन्फ्रा थर्मामीटर घेणे परवडण्यासारखे नाही. रिक्षाचालकांची हीच गरज ओळखून सुनील माने यांनी त्यांना हे साहित्य मोफत दिले आहे.

सुनील माने म्हणाले, रिक्षा चालकांची घरची परिस्थिती अत्यंत बिकट असते. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी या महामारीच्या काळात ही जीव धोक्यात घालून ते कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे त्यांना शक्य होत नाही. या इन्फ्रा थर्मामिटरच्या साहाय्याने प्रवाशांचे तापमान पाहावे त्यानंतर त्याला सॅनिटायझर द्यावे मगच प्रवास करावा ही त्यामागील संकल्पना आहे. यामुळे सार्वजनिक वाहतुकीतून होणारे संक्रमण काही प्रमाणात कमी होईल.रिक्षा चालकांना कर्त्यव्य भावनेतून मदत मी केली. याच मोदीजींना वाढदिवसाच्या खऱ्या अर्थाने शुभेच्छा ठरतील.

Leave a Reply

%d bloggers like this: