व्यवसाय सुरू करण्यास परवानगी न मिळाल्यास आंदोलनाचा पुणे जिल्हा साऊंड,लाईट जनरेटर मंडप असोसिएशनचा इशारा

पुणे – सर्वोच्च न्यायालयाने साऊंड सिस्टिम बंदी घातली नसतांना ही पोलिस प्रशासन बंदी करीत आहे. तसेच लाईट मंडप, जनरेटर व्यावसायिक व्यवसाय बंद असल्याने कर्ज व उपासमारीच्या विळख्यात अडकले आहेत. अनलॉक व कोरोनासह जगणे या सरकारी धोरणाने बस, नाभीक, खाद्य व्यावसायिक तसेच अन्य व्यवसाय योग्य ती खबरदारी घेवून सुरू होत आहेत. त्यामुळेच योग्य त्या अटी शर्ती घालून हे व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी असे निवेदन पुणे जिल्हा साऊंड, लाईट,जनरेटर मंडप असोसिएशनने जिल्हाधिकारी यांना दिले आहे. तसेच हे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या प्रसंगी अध्यक्ष गणेश काळभोर,-अनिल पाटील, निरंजन आव्हाळे, सुनील ओव्हाळ, सिद्धार्थ सुतार, राहुल माने, सुमित गायकवाड, अमोल चांदणे, विकी भोसले, अजय बोज्जा,-नाईम शेख, सचिन काटे, तुषार थुल, आकाश बेलेकर, संतोष शेलार, अनिल कांबळे, रवींद्र के. आदी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: